काय आहेत डॉक्टरांच्या मागण्या?
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील निवासी डॉक्टर (Doctors) त्यांच्या काही मागण्यांसाठी संघर्ष करत आहेत. परंतु या मागण्या पूर्ण होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्य सरकारची (State government) सर्व वैद्यकीय महाविद्यालयं (Medical Colleges) आणि रुग्णालयांतील (Hospitals) निवासी डॉक्टरांनी ७ फेब्रुवारीपासून सामूहिक रजा किंवा संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.
निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या सेंट्रल मार्डचे (Maharashtra Association of Resident Doctors) अध्यक्ष अभिजीत हेलगे यांनी निवासी डॉक्टरांनी पुकारलेल्या संपाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, या संपाबाबत वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांना कळवले आहे. तसेच, डॉक्टरांच्या सर्व मागण्यांबाबतचे पत्रकही वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांना देण्यात आलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून निवासी डॉक्टरांच्या विविध मागणीसाठी आम्ही संघर्ष करत आहोत. मात्र, याबाबत सरकारकडून फारशी सकारात्मक पावलं उचलण्यात आलेली नाहीत, असंही ते म्हणाले.
निवासी डॉक्टरांच्या मागण्या काय?
निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहांची दयनीय अवस्था, बहुतांश सृणालयांमध्ये ज्येष्ठ निवासी डॉक्टरांच्या निवासाची सोय नसणे, नियमित मानधनाचा अभाव, याशिवाय इतर अनेक समस्या अडचणी निवासी डॉक्टरांना सतावत आहेत, असं अभिजीत हेलगे म्हणाले.