Wednesday, July 24, 2024
Homeताज्या घडामोडीPoonam Pandey: मुंबईत अलिशान घर, कोट्यावधींची मालकीण होती पूनम पांडे, जाणून घ्या...

Poonam Pandey: मुंबईत अलिशान घर, कोट्यावधींची मालकीण होती पूनम पांडे, जाणून घ्या किती होती नेटवर्थ

मुंबई: अभिनेत्री पूनम पांडेचे वयाच्या ३२व्या वर्षी निधन झाले आहे. तिच्या निधनाने संपूर्ण इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. पूनम पांडेच्या मृत्यूने केवळ तिचे चाहतेच नव्हे तर संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. कोणाचाच या बातमीवर विश्वास बसत नाही आहे. मात्र आता ही अभिनेत्री या जगात नाही.

पूनम पांडेच्या मृत्यीनंतर तिच्याबद्दल अनेक माहिती समोर येत आहे. अशातच काही लोकांच्या मनात हा प्रश्न आला असेल की पूनम पांडेकडे किती संपत्ती होती.

पूनम केवळ अभिनेत्री नव्हती तर ती मॉडेलिंगच्या जगातील प्रसिद्ध चेहरा होती. याशिवाय ती अनेक रिअॅलिटी शोजमध्येही दिसली आहे. याच कारणामुळे ही अभिनेत्री लहान वयात कोट्यावधीची मालकीण बनली होती.

मीडिया रिपोर्ट्सनुसार पूनम पांडे ५२ कोटी रूपयांची संपत्तीची मालकीण होती. या अभिनेत्रीचे मुंबईत अलिशान घरही आहे. तिने सुंदर पद्धतीने सजवले होते.

घराशिवाय पूनमकडे अनेक लक्झरी गाड्याही होत्या. यात बीएमडब्लूचाही समावेश आहे. पूनम एक लॅव्हिश लाईफ जगत होती.

कामाबाबत बोलायचे झाल्यास अभिनेत्रीने नशा, लव्ह की पॅशन, मालिनी अँड कंपनी, आ गया हिरो आणि द जर्नी ऑफ कर्मा सारख्या सिनेमांमध्ये काम केले होते. याशिवाय तिने अनेक टीव्ही शोज आणि रिअॅलिटी शोजमध्येही काम केले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -