मुंबई: सातत्याने वादात राहणाऱ्या पूनम पांडेचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे. पूनमच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून अभिनेत्रीच्या मृत्यूची बातमी शेअर करण्यात आली आहे. पूनम पांडेच्या अचानक मृत्यूच्या बातमीने प्रत्येकजण हैराण झाले आहे. पूनम पांडे केवळ ३२ वर्षांची होती.
इन्स्टाग्रामवर पूनम पांडेच्या मृत्यूची बातमी
पूनम पांडेच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये लिहिले की ही सकाळ आमच्यासाठी कठीण आहे. तुम्हाला सांगताना खेद होत आहे की आम्ही सर्व्हायकल कॅन्सरमुळे आपल्या प्रिय पूनमला गमावले आहे. तिच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला तिचे प्रेम मिळाले. दु:खाच्या या क्षणी आम्ही प्रायव्हसीची रिक्वेस्ट करत आहोत.
View this post on Instagram
पूनम पांडेच्या मृत्यूने चाहते दुखा:त
पूनम पांडेंच्या मृत्यूची बातमी तिच्या इन्स्टाग्रामवरून देण्यात आली. अभिनेत्रीच्या मृत्यूने तिचे चाहत्यांना मात्र मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत ते आपले दु:ख व्यक्त करत आहेत.