
मुंबई: आजारी पडल्यानंतर सारेचजण औषध घेतात मात्र त्याचा कडवटपणा जीभेवर बराच वेळ राहतो. अनेकांना त्याच्या कडू चवीमुळे औषधे घेणेच नको वाटते. या कडू लागणाऱ्या औषधांना सारेच नाक मुरडतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का की ही औषधे इतकी कडू का असतात. बरीच औषधे ही चवीला कडू असतात. तुम्हालाही याचे उत्तर माहीत नसेल ना तर घ्या जाणून...
औषधाची चव कडू का असते
आरोग्य तज्ञांच्या मते कोणत्याही औषधाची चव कडू यासाठी असते कारण यात अनेक प्रकारचे कंपाऊंड मिसळलेले असतात. प्लांट्स कंपाऊंडसोबत अनेक औषधे ही फॅक्टरीमध्ये बनवलेली असतात. यामध्ये विविध प्रकारचे केमिकल्स असतात. फॅक्टरीमध्ये बनवलेले केमिकल हे नैसर्गिकरित्या कडू असतात. यामुळे ही औषधे कडू असतात.
कॅप्सूल का बनवतात?
तुम्ही विचार करत असाल की काही काही औषधे ही कॅप्सूलच्या रूपात असतात. यामागेही कारण आहे. काही औषधे खूप कडू असतात. ही इतकी कडू असतात की तोंडात गिळूच शकत नाही. अशात या औषधांना कॅप्सूलच्या रूपात बनवले जाते. यामुळे कॅप्सूलवर जिलेटीनचे मऊ कव्हर असते. पोटात गेल्यावर हे जिलेटिनचे कव्हर विरघळून जाते. कॅप्सूलमुळे कडू औषध जीभेच्या संपर्कात येत नाही आणि कडू औषध खाल्ले जाते.