Friday, July 11, 2025

करीना, तब्बू आणि कृती सॅनॉनचा The Crewचा टीझर लाँच

करीना, तब्बू आणि कृती सॅनॉनचा The Crewचा टीझर लाँच

मुंबई: करीना कपूर खान, कृती सॅनॉन आणि तब्बू यांच्या द क्रू या सिनेमाला रिलीज डेट मिळाली आहे. तीनही अभिनेत्रींनी या सिनेमाचा टीझर शेअर करत प्रेक्षकांना सिनेमाची एक झलक दाखवली आहे. सिनेमाच्या टीझरचे बँकग्राऊंड म्युझिक याची जान आहे.


टीझरच्या सुरूवातीला विमाने उडत असतात आणि अभिनेत्रींची नावे समोर येतात. व्हिडिओमध्ये विमानाचा कॅप्टन घोषणा करत आहे. ते म्हणतात की देवियो आणि सज्जनो मी तुमचा कॅप्टन बोलत आहे. आजच्या फ्लाईटमध्ये तुमचे स्वागत आहे. आमची क्रू तुमची खूप काळजी जाईल. मात्र तुम्हा सर्वांना विनंती आहे की अपनी चोली टाईट बांधल ले ताकि दिल बाहर ना गिर जाए.


 



यानंतर तब्बू, करीना कपूर खान आणि कृती सॅनॉन एअरहोस्टेसच्या युनिफॉमर्ममध्ये पाठमोऱ्या दिसतात. व्हिडिओच्या बॅकग्राऊंडमध्ये चोली के पीछे क्या है या गाण्याचे म्युझिक वाजत आहे. तिघांच्या चालण्याच्या स्टाईलवरून समजते की सिनेमात ग्लॅमरचा तडका लागणार नाही. यासोबतच सिनेमाच्या रिलीज डेटही समोर आली आहे. हा सिनेमा २९ मार्च २०२४ला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

Comments
Add Comment