Friday, October 31, 2025
Happy Diwali

अर्थसंकल्पाच्या दिवशी अर्थमंत्र्यांनी का निवडली निळ्या रंगाची ही खास साडी, जाणून घ्या महत्त्व

अर्थसंकल्पाच्या दिवशी अर्थमंत्र्यांनी का निवडली निळ्या रंगाची ही खास साडी, जाणून घ्या महत्त्व

नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२४मधील अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी खास निळ्या रंगाची साडी नेसली होती. जाणून घ्या याचे महत्त्व...

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२४ या वर्षाचा अर्थंसंकल्प सादर करताना खास निळ्या रंगाची साडी नेसली होती. अर्थमंत्री सीतारमण अर्थसंकल्प सादर करताना त्यांच्या साडी नेहमीच चर्चेत असतात कारण या खास दिवशी त्या खास रंगाची साडी नेसतात. त्या नेहमी खादी आणि हँडलूम साड्यांना प्राधान्य देतात.

यंदाच्या अर्थसंकल्पादरम्यान अर्थमंत्री सीतारमण निळ्या रंगाची साडी नेसून संसद भवनात पोहोचल्या होत्या. या निळ्या रंगाच्या साडीची किनार क्रीम रंगाची होती तसेच क्रीम रंगाचा ब्लाऊज होता.

निळा रंग ज्ञान तसेच शांततेचे प्रतीक असते. फेंगशुईमध्ये निळ्या रंगाला प्रगती आणि सकारात्मक परिवर्तनाचा रंग असते. याचा योग्य प्रकारे वापर झाल्यास सदस्यांना आरोग्याचे लाभ होतात. चिंतेपासून मुक्तता मिळते. तसेच आर्थिक आणि बौद्धिक प्रगती होते.

इतकंच नव्हे तर निळा रंग पाण्याप्रमाणेत चंचल, गतीमान आणि जीवनदायिनीची शक्ती प्रदान करतो. धर्म शास्त्रात निळा रंग बल, पुरूषार्थ तसेच वीरतेचे प्रतीक मानला जातो.

खास निळ्या रंगाची साडी नेसलेल्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या दरम्यान लाल रंगाची छोटी टिकली आणि कानात छोटे टॉप्स घातले होते. हातात सोन्याच्या बांगड्या होत्या. यावेळी लाल रंगाचा लिफाफा होता.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा