Saturday, July 20, 2024
Homeताज्या घडामोडीUnion Budget 2024 : मध्यमवर्गाला मिळणार हक्काचे घर; १ कोटी नागरिकांना ३००...

Union Budget 2024 : मध्यमवर्गाला मिळणार हक्काचे घर; १ कोटी नागरिकांना ३०० यूनिट मोफत वीज

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी आज अंतरिम बजेट (Union Budget 2024) सादर केला. कररचनेत कोणताही बदल या अर्थसंकल्पात नाही. त्यामुळे आता करदात्यांना जुलैमध्ये सादर होणाऱ्या बजेटची वाट पाहावी लागणार आहे. मध्यमवर्गाला स्वतःचे हक्काचे घर घेण्यासाठी योजना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या भाषणात जाहीर केली. युवा, गरीब, महिला आणि शेतकरी वर्गासाठी योजनांची घोषणा सीतारमण यांनी केली. २०४७ पर्यंत भारताला विकसीत भारत करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.

आयुष्मान भारत योजना यापुढे आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांनाही लागू असणार आहे. लखपती दीदी योजनेचे लक्ष्य दोन कोटींवरून तीन कोटी करण्यात आले आहे.

१ कोटी नागरिकांना ३०० यूनिट मोफत वीज

पंतप्रधान सूर्योदय योजने अंतर्गत ३०० युनीट वीज मोफत मिळणार आहे. तसेच या योजनेंतर्गत १ कोटी घरांवर सौर ऊर्जा प्रकल्प लावण्यात येणार आहे.

पीएम मुद्रा योजनेंतर्गंत ४३ कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप

गेल्या १० वर्षात पीएम मुद्रा योजनेंतर्गंत मोदी सरकारने गरीबांना, शेतकऱ्यांना, महिला आणि युवकांना अनेक सुविधा उपलब्ध मोदींनी दिल्या आहेत. गेल्या दहा वर्षात पीएम मुद्रा योजनेंतर्गंत ४३ कोटीच्या कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. आतपर्यंत २२.५० लाख कोटी नागरिकांना याचा फायदा झाला आहे.

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ७० टक्के महिलांना मिळाली पक्की घरे

दहा वर्षात महिलांना प्रोत्साहन देण्यात आले आहे. दहा वर्षात पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ७० टक्के महिलांना घरे देण्यात आले आहे. ग्रामीण भागात या योजनेचा ७० टक्के महिलांना लाभ झाला आहे.

पंतप्रधान आवास योजने अंतर्गत तीन कोटी घर बनवण्यात आली आहेत. पुढील पाच वर्षात आणखी दोन कोटी घरे बनवण्यात येणार आहे. सर्वाईकल कॅन्सरच्या लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकारकडून काम सुरू आहे. मुलींसाठी नवा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे.

स्किल इंडिया मार्फत १.४ कोटी युवकांना प्रशिक्षण

स्किल इंडिया मिशन अंतर्गत १.४ कोटी युवकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. या मिशन अंतर्गत २० मंत्रालयांनी देशात विविध योजना सुरू केल्या.

पंतप्रधान जनमन योजनेतून आदिवासी समाजाचा विकास

पंतप्रधान जनमन योजनेतून आदिवासी समाजाचा विकास झाला आहे. पंतप्रधान जन धन योजनेअंतर्गत आदिवासी समाजापर्यंत पोहोचले पाहिजे. खास जमातींसाठी खास योजना आणली आहे. पायाभूत सुविधांच्या विकासाला गती मिळाली आहे. सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचत आहेत. सरकार गरिबी हटवण्याचे काम करत आहे. सरकारने आव्हानांचा धैर्याने सामना केला आहे. ग्रामीण विकासाच्या योजना राबविण्यात आल्या आहेत.

देशातील ४ कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान पीकविमा योजनेचा फायदा

देशातील ४ कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान पीकविमा योजनेचा फायदा झाला आहे. ११.८ कोटी लोकांना पंतप्रधान किसान योजनेतून आर्थिक मदत मिळाली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -