Thursday, July 18, 2024
Homeताज्या घडामोडीUnion Budget 2024 : सर्वाइकल कॅन्सरपासून बचावासाठी ९ ते १४ वर्षांच्या मुलींना...

Union Budget 2024 : सर्वाइकल कॅन्सरपासून बचावासाठी ९ ते १४ वर्षांच्या मुलींना मोफत लस देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी आज सलग सहाव्यांदा देशाचा अर्थसंकल्प (Union Budget 2024) सादर केला. यंदा निवडणुकीचे वर्ष असल्यामुळे अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यावेळी अर्थमंत्र्यांनी सांगितले की, अर्थसंकल्पात आरोग्य विभागाच्या विकासाबाबत भरपूर समावेश करण्यात आला आहे. सर्वाईकल कॅन्सर रोखण्यासाठी ९ ते १४ वर्ष वयोगटातील मुलींसाठी मोफत लसीकरण मोहीम सुरू करण्यात येणार आहे. मिशन ‘इंद्रधनुष’ अंतर्गत हे अभियान सुरू करण्यात येणार आहे.

आयुष्मान भारत योजनेंतर्गत आरोग्य कवच सर्व आशा आणि अंगणवाडी सेविका आणि सहाय्यकांना देण्यात येईल. माता आणि बाल आरोग्य सेवेबद्दल, सीतारमण यांनी सांगितले की, माता आणि बाल आरोग्य सेवेसाठी विविध योजना राबवल्या जातील. अंगणवाड्यांचा दर्जा वाढविला जाईल.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) सर्वाइकल कॅन्सर टाळण्यासाठी Cervavac नावाची लस विकसित करेल, जी HPV च्या चार प्रकारांपासून संरक्षण प्रदान करते – 16, 18, 6 आणि 11. SII चे CEO आदर पूनावाला यांनी आधीच सांगितले होते की, या लसीची किंमत २००-४०० रुपये प्रति रुपये डोस असेल. सध्या बाजारात गर्भाशय ग्रीवाच्या लसी उपलब्ध आहेत. त्या लसींची किंमत प्रति डोस २,५०० ते ३,३०० रुपये आहे.

सिक्कीम सरकारने २०१६ मध्ये GAVI नावाची लस खरेदी केली आणि ही लस ९ ते १४ वर्ष वयोगटातील मुलींना देण्यात आली. आकडेवारी दर्शवते की, सिक्कीम सरकारच्या आकडेवारीनुसार, या कार्यक्रमांतर्गत ९७ टक्के मुलींचे लसीकरण करण्यात आले. आता ते नियमित लसीकरणाचा भाग म्हणून प्रदान करतात आणि कव्हरेज टक्केवारी सुमारे ८८ ते ९० टक्के आहे.

अर्थमंत्री म्हणाल्या की, देशात महिलांसाठी अनेक योजना राबविण्यात येत असून त्यामुळे त्यांचा आर्थिक आणि सामाजिक विकास होत आहे. लखपती दीदी योजनेंतर्गत देशात १ कोटी लखपती दिदी बनल्या आहेत. त्यांचे उद्दिष्ट २ कोटींवरून ३ कोटी करण्यात आलं असून ३ कोटी लखपती दिदी तयार करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. ९ ते १४ वर्षे वयोगटातील मुलींना सर्वाईकल कॅन्सरची लस दिली जाईल, जेणेकरून हा कर्करोग टाळता येईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -