मुंबई : सनी लिओनी (Sunny Leone) ही कायम चर्चेत असलेली अभिनेत्री आहे. फॅशन, व्यवसाय आणि आता डान्सिंग सुपरस्टार असलेली सनी ही “फना” हे नवं व्हिडिओ साँग प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आली आहे. सनीने तिच्या सोशल मीडियावर हे गाण रिलीज करण्याची घोषणा केली आहे.
View this post on Instagram
व्हिडिओमध्ये सशक्त नृत्यदिग्दर्शन आणि सनीची (Sunny Leone) आकर्षक उपस्थिती दिसून येते असून कलात्मक बाजू यातून बघायला मिळते. सनी लिओनी आगामी ‘ग्लॅम फेम’ शोला जज करणार आहे आणि अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘केनेडी’ या राहुल भट्टसोबत तिच्या जागतिक स्तरावर प्रशंसित चित्रपटाची वाट पाहत आहे. ‘कोटेशन गँग’ या चित्रपटाद्वारे तिच्या तमिळ चित्रपटसृष्टीत प्रवेशाचीही चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत, जिथे ती जॅकी श्रॉफ, प्रियामणी आणि सारा अर्जुनसोबत सामील होते. ती Spiltsvilla सीझन ५ देखील होस्ट करणार आहे.