नीतू प्रसाद
तण ही अवांछित, अनाकर्षक किंवा त्रासदायक मानली जाणारी वनस्पती आहे. विशेषत: नको तिथे वाढणारी आणि अनेकदा वेगाने वाढणारी, पसरणारी किंवा इच्छित वनस्पतींची जागा घेणारी. पण, जेव्हा तुम्ही समुद्री तण किंवा सीवीड हे शब्द ऐकता तेव्हा तुमच्या मनात काय येते? आपल्यापैकी बहुतेकांसाठी ते जलपर्णीची सागरी आवृत्ती आहेत, जी भारतीय तलावांमध्ये जलावतरणात अडथळे निर्माण करतात. या सागरी शैवाल कुटुंबाच्या प्रचंड आर्थिक क्षमतेबद्दल फारसे कुणाला माहिती नाही.
समुद्रातील एक आश्चर्यकारक वनस्पती म्हणून समुद्री तणाला जागतिक मान्यता मिळत आहे. हे प्रजनन आणि खाद्य भूमी म्हणून काम करून सागरी जैवविविधतेला प्रोत्साहन देते. ते कार्बन शोषून घेते, महासागराची आम्लता कमी करते आणि हानिकारक शैवालांच्या वाढीला मदत करणारी अतिरिक्त पोषक द्रव्ये शोषून घेते. हे किनारपट्टीवरील समुदायांसाठी एक नूतनीकरणीय संसाधनदेखील असू शकते, ज्यामुळे हवामान बदलाने वाढत्या प्रमाणात प्रभावित होणाऱ्या मच्छीमारी बाजारपेठेच्या तुलनेत त्यांना अधिक स्थिर उत्पन्न मिळते. असा अंदाज आहे की, एक टन समुद्री तण १२० किलोग्राम कार्बन डायऑक्साइड, दोन किलोग्राम नायट्रोजन आणि अडीच किलोग्राम फॉस्फरस शोषू शकेल. शिवाय व्यावहारिकदृष्ट्या त्याला शुद्ध पाण्याची शून्य आवश्यकता असेल. अशाप्रकारे, नील अर्थव्यवस्था आणि हरित कृषी पद्धतींसाठी हे प्रचंड बलगुणक होऊ शकते. त्याच्या जन्मजात गुणधर्मांमुळे अन्न, औषधे, खते, सौंदर्यप्रसाधने, जैविक साहित्य इत्यादींमधील नैसर्गिक घटक म्हणून समुद्री तणाची गणना होते आणि त्याची सध्याची जागतिक बाजारपेठ १७ अब्ज डॉलर्सची आहे.
ऐतिहासिक पार्श्वभूमी : सुरुवातीच्या लिखित नोंदीनुसार किमान १५०० वर्षांपूर्वी जपानमध्ये सीवीडचे प्रथम सेवन करण्यात आले. मध्यम कालखंडापर्यंत, फक्त जंगली समुद्री तण उपलब्ध असल्याने अन्नस्त्रोत म्हणून मर्यादित ठरले. टोकुगावा कालखंडात (१६००-१८०० ख्रिस्तपश्चात) जेव्हा मच्छीमारांनी समुद्रकिनारी कुंपण बांधले आणि राजाला दररोज ताजे मासे पुरवण्यासाठी मत्स्यशेती सुरू केली, तेव्हा समुद्री तण लागवडीचा जन्म झाला. या कुंपणावर सीवीड प्राधान्याने वाढत असल्याचे त्यांना आढळले.
भारतात समुद्री तणाची लागवड ‘सेंटर फॉर सॉल्ट अँड मरिन केमिकल्स रिसर्च इन्स्टिट्यूट’ (सीएसएमसीआरआय)च्या आश्रयाने सुरू झाली, जिने १९८० च्या दशकात प्रायोगिक हेतूने कॅपाफायकस अल्वारेझिल फिलीपिन्समधून भारतात आणले. सीवीडला प्रायोगिक शेतातून व्यावसायिक शेतात जाण्यास वेळ लागला नाही. सीएसएमसीआरआयच्या मदतीने, पेप्सी कंपनीने २००० च्या सुरुवातीस तामिळनाडूच्या किनारी भागात सीवीडची व्यावसायिक शेती सुरू केली. कॅपाफायकस अल्वारेझिल हा कॅरेजिनन्सचा एक महत्त्वाचा स्त्रोत आहे, ज्याचा उपयोग विविध खाद्यपदार्थांमध्ये केला जातो, जसे की दुग्धजन्य पदार्थांमध्ये स्थिरीकरण करणारे घटक. चॉकलेट्स, आईस्क्रीम, पॅकेज्ड फूड, टूथपेस्ट आणि अगदी औषधे यांसारख्या औद्योगिक उत्पादनांमध्ये या जेलीचा एजंटप्रमाणे वापर करतात. याने तामिळनाडूच्या स्थानिकांना विशेषत: महिलांना रोजगाराची नवी शेती दिली. २००८ मध्ये पेप्सी यासह-व्यवसायातून बाहेर पडली. पेप्सीचे एक माजी सहकारी कर्मचारी अभिराम सेठ यांनी ॲक्वाग्री नावाची कंपनी स्थापन करून व्यवसाय हाती घेतला तेव्हापासून असंख्य समुद्री तण कंपन्या आणि स्टार्टअप्स सीवीडचा व्यावसायिक वापर शोधण्यासाठी अस्तित्वात आल्या.
‘प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना’ (पीएमएमएसवाय) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२० मध्ये सुरू केली, जिने केवळ उपलब्ध पायाभूत सुविधा आणि मत्स्यव्यवसाय मूल्य शृंखलाच बळकट केल्या नाहीत; तर ती भारतीय मत्स्यव्यवसाय क्षेत्रात उलगडल्या गेलेल्या नवीन उपक्रमाचा आधारस्तंभदेखील बनली आहे. पीएमएमएसवायची संकल्पना आहे की, कृत्रिम खडक, समुद्री शेती तसेच समुद्री तण शाश्वत, हवामानास लवचिक आणि फायदेशीर प्रारूप ठरेल, ज्यामुळे निव्वळ मच्छीमारांच्या उत्पन्नात सुधारणा होईल. किनारपट्टीवरील महिलांना उपजीविका प्रदान करेल, असे नव्हे, तर तो माशांच्या साठ्याचे शाश्वत व्यवस्थापन करण्याचा अचूक मार्ग असेल. भारताला ८००० किमीपेक्षा जास्त लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे आणि पारंपरिकपणे तामिळनाडू, गुजरात, अंदमान आणि निकोबार, लक्षद्वीप, ओडिशा आणि महाराष्ट्राला नैसर्गिकरीत्या वाढणाऱ्या समुद्री तणांच्या विविध प्रजातींचे वरदान मिळाले आहे. मुंबई, रत्नागिरी, गोवा, कारवार, वर्कला, विझिंजम, पुलिकत, तामिळनाडूमधील रामेश्वरम, गुजरात आणि ओडिशातील चिलिकाच्या आसपास सीवीडचे समृद्ध पट्टे आढळतात.
सध्याची परिस्थिती : पीएमएमएसवायअंतर्गत, समुद्री तण लागवड आणि संबंधित कामांसाठी ९९ कोटी रुपयांची केंद्रीय हिस्सेदारी अंतर्भूत असलेले एकूण १९३.८० कोटी रुपये खर्चाचे प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. किनारपट्टीवरील राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि संशोधन संस्था यांना ४६,०९५ तराफे, ६५,३३० मोनो-लाइन्स यांच्या उपलब्धतेसाठी तसेच तामिळनाडूत १२७.७ कोटी रुपयांच्या सीवीड पार्कच्या विकासासाठी निधी देण्यात आला आहे. संशोधक, उद्योजक, स्टार्टअप्स आणि बचतगटाच्या महिलांसाठी सक्षम परिसंस्था प्रदान करणे हे या सीवीड पार्कचे उद्दिष्ट आहे. गतवर्षी केंद्रीय मंत्री परशोत्तम रूपाला यांच्या हस्ते पायाभरणी करण्यात आली आणि आता हे काम वेगाने सुरू आहे.
परिपूर्ण भविष्यकाळ : समुद्रातील एक आश्चर्यकारक वनस्पती म्हणून समुद्री तण विलक्षण वेगाने वाढून ४५ ते ६० दिवसांत कापणीसाठी तयार होते. मत्स्यव्यवसाय विभागाचे उद्दिष्ट आहे की, जंगली झेल आणि ॲक्वा कल्चरद्वारे दरवर्षी सुमारे ११ लाख टन समुद्री तण तयार करणे, वाढत्या जागरूकतेमुळे, सीवीडची देशांतर्गत मागणी अनेक पटींनी वाढली आहे आणि आम्ही आमच्या गरजांपैकी जवळपास ७०% आयात करत आहोत. हे प्रमाण कमी करण्यासाठी, स्वयंपूर्णता मिळवण्यासाठी आणि निव्वळ निर्यातदार बनण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलण्याची गरज आहे. या दिशेने पुढील गोष्टी करता येतील –
शेतीच्या पद्धतीत परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता ओळखून पंतप्रधानांनी बचत गटाच्या महिला आणि शेतकऱ्यांना औषधी पोषण आणि इतर मूल्यांसाठी समुद्री तणाची लागवड करण्याचे आवाहन केले आहे. तत्त्ववेत्ता गोएथ म्हणाले आहेत, “तुम्ही जे काही करता किंवा तुम्ही जे स्वप्न पाहू शकता, ते सुरू करा. धाडसीपणामध्ये प्रतिभा, सामर्थ्य आणि जादू आहे.” सीवीड उत्पादनात भारताला जागतिक अग्रेसर बनवण्याचा आमचा प्रयत्न सध्या एक स्वप्न असू शकेल; परंतु माननीय पंतप्रधानांच्या शक्तिशाली नेतृत्वाखालच्या या प्रारंभामुळे धाडसी उपाययोजना आणि पुढाकारांच्या सहाय्याने जादूई परिवर्तन होऊ शकते.[लेखक केंद्रीय मत्स्यव्यवसाय आणि पशुपालन मंत्रालयाच्या मत्स्यव्यवसाय विभागाच्या सहसचिव (सागरी मत्स्यव्यवसाय) आहेत.]
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…