Saturday, July 13, 2024
Homeताज्या घडामोडीNirmala Sitharaman Budget Speech : आमच्या सरकारने चार जातींवर लक्ष दिलं; २५...

Nirmala Sitharaman Budget Speech : आमच्या सरकारने चार जातींवर लक्ष दिलं; २५ कोटी लोकांची गरिबी हटवली!

अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी काय म्हणाल्या निर्मला सीतारामन?

नवी दिल्ली : आज भारतीय अर्थव्यवस्थेसाठी (Indian Economy) मोठा दिवस आहे. दरवर्षीप्रमाणे आज म्हणजेच १ फेब्रुवारीला अर्थमंत्री (Finance Minister) संपूर्ण वर्षाचा अर्थसंकल्प (Budget 2024) जाहीर करतात. या अर्थसंकल्पाच्या वाचनादरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी भारत सरकारचे कौतुक केले. गेल्या १० वर्षात आम्ही जे काम केलंय त्याच्या भरवशावर देशाची जनता आम्हाला पुन्हा संधी देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

निर्मला सीतारामन म्हणाल्या, देशातल्या प्रत्येक गावातल्या प्रत्येक घरापर्यंत सुविधा कशी मिळेल याबद्दल आम्ही प्रयत्न केले. देशातील ८० कोटी जनतेला आम्ही मोफत रेशन दिलं. मोदींनी सर्व क्षेत्रांमध्ये नोकरीच्या संधी निर्माण केल्या. २०४७ पर्यंत भारताला विकसित बनवण्याचा आमचा प्रयत्न असून त्या दृष्टीने गेल्या १० वर्षांपासून प्रयत्न सुरू केले आहेत, असं त्या म्हणाल्या. देशातील २५ कोटी जनतेला आम्ही गरिबीच्या खाईतून बाहेर काढण्यास यशस्वी ठरलो आहोत, असंही त्या म्हणाल्या.

अर्थमंत्री म्हणाल्या, चार जातींवर आम्ही लक्ष ठेवायला हवं. त्या म्हणजे गरीब, महिला, तरुण व अन्नदाता. त्यांच्या गरजा, महत्त्वाकांक्षा आणि विकास ही आमच्यासाठी प्राधान्याची बाब आहे. देशाचा विकास त्यांच्या विकासात दडलेला आहे. त्यांच्या विकासातून देशाचा विकास साध्य होणार आहे.

आम्ही भ्रष्टाचार संपवला

अर्थमंत्री म्हणाल्या, प्रत्येक घरात पाणी, सर्वांना वीज, गॅस, वित्तीय सेवा आणि बँक खाती उघडण्याचे काम केले आहे. जनतेच्या अन्नविषयक समस्या दूर केल्या आहेत. ८० कोटी लोकांना मोफत अन्नधान्य देण्यात आले आहे. मूलभूत गरजा पूर्ण झाल्या, त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांचे उत्पन्न वाढले आहे. भारत २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र होईल. आम्ही लोकांना सक्षम करण्यासाठी काम करत आहोत. आम्ही भ्रष्टाचार आणि घराणेशाही संपवली आहे.

मोदींच्या काळात जनतेला जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या

देशातील जनता भविष्याकडे पाहत आहे. ते आशावादी आहेत. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही पुढे जात आहोत. २०१४ मध्ये जेव्हा पंतप्रधान मोदींनी कामाला सुरुवात केली तेव्हा अनेक आव्हाने होती. जनहितार्थ काम सुरू केले आहे. जनतेला जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. देशात एक नवा उद्देश आणि आशा निर्माण झाली आहे. जनतेने आम्हाला दुसऱ्यांदा सरकारमध्ये निवडून दिले. आम्ही सर्वसमावेशक विकासाबद्दल बोललो. सर्वांचा पाठिंबा, सर्वांचा विश्वास आणि सर्वांचे प्रयत्न या मंत्राने पुढे जातोय, असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -