Thursday, May 15, 2025

देशमहत्वाची बातमी

LPG Cylinder Price Hike : बजेटपूर्वीच एलपीजी गॅसच्या किंमतीचा स्फोट; सर्वसामान्यांना आणखी एक फटका!

LPG Cylinder Price Hike : बजेटपूर्वीच एलपीजी गॅसच्या किंमतीचा स्फोट; सर्वसामान्यांना आणखी एक फटका!

नवी दिल्ली : आजचा दिवस भारताच्या अर्थव्यवस्थेच्या (Indian Economy) दृष्टीने महत्त्वाचा आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) संसदेत अंतरिम अर्थसंकल्प (Interim Budget 2024) सादर करणार आहेत. मात्र, त्यापूर्वीच जीवनावश्यक वस्तू महागत असल्याच्या चर्चा होत असतानाच एलपीजी गॅसच्या किंमतींचाही स्फोट (LPG Cylinder Price Hike) झाला आहे. दर महिन्याच्या सुरुवातीला तेल विपणन कंपन्या (IOCL) एलपीजी गॅसच्या किंमती जाहीर करतात. यंदाच्या महिन्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या (Commercial gas cylinder) किंमती वाढल्या आहेत.


IOCL च्या वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, व्यावसायिक सिलेंडरच्या किंमती १४ रुपयांनी वाढवण्यात आल्या आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी १ जानेवारी २०२४ रोजी १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किंमती कमी केल्या होत्या. गेल्या महिन्यात एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत झालेली कपात अत्यंत किरकोळ होती. केवळ दीड रुपयांनी ही किंमत कमी झाली होती. यानंतर वाढलेले नवे दर आज १ फेब्रुवारी २०२४ पासून लागू झाले आहेत.


नव्या किंमतींनुसार, मुंबईत पूर्वी १७०८ रुपयांना मिळणारा व्यावसायिक सिलेंडर आता १७२३ रुपयांना मिळणार आहे. दिल्लीमध्ये याची किंमत १७५५.५० रुपयांवरून १७६०.५० रुपये झाली आहे. कोलकातामध्ये एका सिलेंडरची किंमत १८६९ रुपयांवरून १८८७ रुपये करण्यात आली आहे. तर चेन्नईमध्ये त्याची किंमत १९२४.५० रुपयांवरून १९३७ रुपयांपर्यंत वाढली आहे.



घरगुती सिलेंडरच्या दरांत बदल नाही


व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरांत वाढ करण्यात आली असली तरी घरगुती गॅस सिलेंडरचे दर मात्र स्थिर आहेत. १४.२ किलो LPG सिलेंडरची किंमत दिल्लीत ९०३ रुपये, कोलकात्यात ९२९ रुपये, मुंबईत ९०२.५० रुपये आणि चेन्नईमध्ये ९१८.५० रुपये आहे. घरगुती LPG च्या दरांत शेवटचा बदल ३० ऑगस्ट २०२३ रोजी करण्यात आला होता.


Comments
Add Comment