Sunday, August 10, 2025

इंग्लंडने दुसऱ्या कसोटीसाठी केली प्लेईंग ११ची घोषणा, शोएब बशीरचे पदार्पण

इंग्लंडने दुसऱ्या कसोटीसाठी केली प्लेईंग ११ची घोषणा, शोएब बशीरचे पदार्पण
विशाखापट्टणम - इंग्लंडने शुक्रवारी २ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या विशाखापट्ट्णम येथील दुसऱ्या कसोटीसाठी आपल्या प्लेईंग ११ची घोषणा केली आहे. इंग्लंडने दुसऱ्या कसोटीसाठी आपल्या संघात दोन बदल केले आहेत.

अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन पुन्हा संघात परतला आहे. तर स्पिनर शोएब बशीरला पदार्पणाची संधी मिळत आहे. हैदराबादमध्ये खेळवण्यात आलेल्या पहिल्या कसोटीत इंग्लंडचा पहिला डाव १९० धावांनी पिछाडीवर असतानाही त्यांनी २८ धावांनी विजय मिळवला होता.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना २ ते ६ फेब्रुवारीदरम्यान विशाखापट्टणमच्या डॉ. वाय एस राजशेखर क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला जाईल. येथे तुम्हाला स्पिन फ्रेंडली ट्रॅक पाहायला मिळू शकतो. इंग्लंडचा संघ पाच सामन्यांच्या मालिकेत १-० असा आघाडीवर आहे.

दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचे प्लेईंग११ - जॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्ट्रॉ, बेन स्टोक्स (कर्णधा), बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, शोएब बशीर आणि जेम्स अँडरसन.
Comments
Add Comment