Saturday, July 20, 2024
Homeताज्या घडामोडीAnkita Lokhande : बिग बॉसचं विजेतेपद हुकलं पण मिळाली मोठी संधी!

Ankita Lokhande : बिग बॉसचं विजेतेपद हुकलं पण मिळाली मोठी संधी!

‘या’ अभिनेत्यासोबत स्क्रीन शेअर करणार अंकिता; करिअरची गाडी सुसाट!

मुंबई : बिग बॉस सीझन १७ मुळे (Bigg boss 17) अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) प्रचंड चर्चेत आली. या शोमुळे तिच्या चाहतेवर्गात (Fan following) वाढ झाली. बिग बॉसची विजेती अंकिता होणार असं अनेकांना वाटत होतं. मात्र, अधिक छान खेळी केलेला आणि जास्त वोटिंग मिळवलेला मुनावर फारुकी (Munnawar Faruqui) विजेता ठरला. पण अंकिताचं विजेतेपद हुकलं असलं तरी तिच्या करिअरवर तिळमात्र परिणाम झालेला नाही. उलट तिच्या करिअरची गाडी सुसाट सुटली आहे. अंकिताला एका मोठ्या चित्रपटासाठी विचारणा झाली आहे. शिवाय या चित्रपटात ती मोठ्या अभिनेत्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. त्यामुळे ही तिच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

‘बिग बॉस १७’ मध्ये सहभागी होण्याआधी अंकिता लोखंडे कोणत्याही मोठ्या प्रोजेक्टचा भाग नव्हती. पण ‘बिग बॉस १७’ मधून बाहेर पडताच अंकिताला एक मोठा सिनेमा मिळाला आहे. अंकिताने सोशल मीडियावर ‘वीर सावरकर’ (Veer Savarkar) या सिनेमाचा टीझर शेअर केला आहे. टीझर शेअर करत तिने या सिनेमाचा भाग असल्याचा खुलासा केला आहे. ‘बिग बॉस १७’ संपताच ‘वीर सावरकर’च्या निर्मात्यांनी अंकिताला विचारणा केली. अभिनेत्रीने लगेचच या सिनेमासाठी होकार दिला.

अंकिता लोखंडे या सिनेमात रणदीप हुड्डासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. रणदीप हुड्डाचा (Randeep Hooda) हा सिनेमा २२ मार्च २०२४ रोजी रिलीज होणार आहे. अंकिता या सिनेमात कोणत्या भूमिकेत झळकणार हे मात्र समोर आलेलं नाही. मात्र ‘वीर सावरकर’च्या माध्यमातून रुपेरी पडदा गाजवायला अंकिता लोखंडे सज्ज आहे.

अंकिता लोखंडेने ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. या मालिकेच्या माध्यमातून ती घराघरांत पोहोचली. मालिकेनंतर अंकिता सिनेसृष्टीकडे वळाली. कंगना रनौतच्या ‘मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांसी’ या सिनेमाच्या माध्यमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा सिनेमा कमी पडला. या सिनेमासह ती ‘बागी ३’ मध्येही झळकली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -