इंफाळ: मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार भडकला आहे. मंगळवारी येथे गोळीबार झाला. या दरम्यान दोन लोकांचा मृत्यू झाला. या हिंसाचारादरम्यान भारतीय जनता पक्षाचे माजी युवा अध्यक्षांसह पाच जण जखमी झाल्याची माहिती आहे. पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांच्या संख्येत वाढ होऊ शतकते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मणिपूरमधील हा गोळीबार मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सुरू झाला. त्यानंतर अनेक तास हा गोळीबार सुरू होता. या गोळीबारात मृत झालले्या लोकांची ओळख पटली आहे. ३३ वर्षीय नोंगथोम्बम मायकल आणि २५ वर्षीय मीस्नाम खाबा अशी यांची नावे आहेत. दोघांचे मृतदेह रीजनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सला नेण्यात आले.
काय म्हणतायत मणिपूर पोलीस?
मणिपूर पोलिसांनी आपल्या अधिकृत हँडलवरून याची माहिती दिली. त्यात त्यांनी सांगितले की इंफाळ पश्चिम आणि कांगपोकपी जिल्ह्यात सीमेवर दोन गटाच्या लोकांमध्ये गोळीबार झाला.
महिन्याभरात ९ जणांचा मृत्यू
एका रिपोर्टनुसार गेल्या एक महिन्यात मणिपूरमध्ये उसळलेल्या हिंसाचारात कमीत कमी ९ लोकांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये हिंसाक्षेत्र भागात तैनात असलेल्या दोन पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सुबेमध्ये गेल्या वर्षी ३ मे २०२२मध्ये झालेल्या हिंसाचारात १८०हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता तर ३०००हून अधिक जखमी झाले होते. या हिंसाचारात हजारो लोक स्थलांतरित झालेत.