नवी दिल्ली: झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी बुधवारी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यानंतर काही वेळात अंमलबजावणी संचलनालयाकडून त्यांना अटक करण्यात आली. ईडीने मुख्यमंत्री कार्यालयात दुपारी दीड वाजल्यापासून त्यांची चौकशी सुरू केली होती.
रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ते राजभवनात पोहोचले आणि त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. राज्यपालांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. राजीनामा दिल्यानंतर ईडीने त्यांना अटक केली आहे. अटकेआधी झारखंडचे मुख्य सचिव आणि डीजीपी सीएम मुख्यालयात पोहोचले. येथे कडक बंदोबस्त करण्यात आली. रांचीमध्ये पोलिसांनाही अलर्ट ठेवण्यात आले आहे. ईडी कार्यालय, राजभवन आणि मुख्यमंत्री कार्यालयाजवळ कलम १४४ लागू करण्यात आली आहे.
Hemant Soren submits his resignation from the Jharkhand CM’s post to Governor CP Radhakrishnan at the Raj Bhawan
(Source: Raj Bhawan) pic.twitter.com/aSp9omvkRV
— ANI (@ANI) January 31, 2024
हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर चंपाई सोरेन यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची सूत्रे आली आहेत. याआधी हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांचे नाव या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते. दरम्यान कल्पना यांच्यावरून कुटुंबातूनच विरोधी स्वर उठू ागले.