Monday, April 21, 2025
Homeताज्या घडामोडीArvind Kejriwal : ईडीकडून अरविंद केजरीवालांना पाचव्यांदा समन्स

Arvind Kejriwal : ईडीकडून अरविंद केजरीवालांना पाचव्यांदा समन्स

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना दारु घोटाळा प्रकरणी पुन्हा ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे. ईडीने केजरीवाल यांना पाचव्यांदा चौकशीसाठी बोलावले आहे. याआधीही दारु घोटाळ्याप्रकरणी ईडीने केजरीवालांना चौकशीसाठी बोलावले होते. पण समन्स बजावण्याची कारवाई सुडबुद्धीने केली जात असल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.

केजरीवाल यांना १७ जानेवारी, ३ जानेवारी, २१ डिसेंबर आणि २ नोव्हेंबर रोजीही समन्स बजावण्यात आले होते. मात्र, अरविंद केजरीवाल ईडी कार्यालयात हजर झाले नाहीत.

अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यासाठीच ही कारवाई केली जात असल्याचा आरोप आम आदमी पक्षाकडून केला जात आहे. सत्ताधारी भाजप चौकशीसाठी बोलावून अटक करणार असल्याचे आम आदमी पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले. चौकशी करायची असेल तर प्रश्न लिहुन केजरीवालांकडे देऊ शकतात, असे आपच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

ईडीला पाठवलेल्या पत्रात केजरीवाल यांनी म्हटले की, प्रत्येक कायदेशीर समन्स स्वीकारण्यास तयार आहे, परंतु हे समन्स देखील ईडीने पूर्वी पाठवलेल्या समन्सप्रमाणेच बेकायदेशीर आहे. हे समन्स राजकीय हेतूने प्रेरित असून समन्स मागे घेण्याची मागणी केजरीवालांकडून करण्यात आली होती. तसेच मी माझे आयुष्य प्रामाणिकपणे आणि पारदर्शकतेने जगलो. माझ्याकडे लपवण्यासारखे काही नसल्याचे केजरीवाल यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, दारु घोटाळा प्रकरणी आम आदमी पक्षाचे नेते मनिष सिसोदिया आणि संजय सिंह तुरुंगात आहेत. आता या प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना समन्स पाठवून आरोपी करण्याची तयारी आहे. मागील वर्षी आप नेते विजय नायर यांनाही याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -