म्हातारपणात एकटं वाटू लागल्याने शोधला जोडीदार
भोपाळ : आजवर अनेक जोडप्यांमध्ये वयाचं अंतर खूप जास्त असल्याचं आपण पाहिलं आहे. शिवाय अनेकदा काही लोक दोन ते तीनहून अधिक वेळा संसारही थाटतात. पण भोपाळमध्ये (Bhopal) समोर आलेली एक घटना यापेक्षा वेगळी आहे. यामध्ये तब्बल १०३ वर्षांच्या वृद्धाने ४९ वर्षीय महिलेशी निकाह केला आहे. म्हातारपणात एकटं वाटू लागल्याने व काळजी घेण्यासाठी कोणीच नसल्याने त्याने हा निकाह केला. तर पतीच्या निधनानंतर आपणही एकटे पडल्याने हा निकाह केल्याचे ४९ वर्षीय महिलेने सांगितले.
हबीब नजर असं या १०३ वर्षांच्या वृद्धाचं नाव आहे, तर महिलेचं नाव फिरोज आहे. हबीब नजर हे भोपाळच्या इतवारा भागात राहणारे स्वातंत्र्य सैनिक आहेत. त्यांचा पहिला निकाह नाशिकमध्ये झाला होता. तर दुसरा निकाह लखनऊमध्ये झाला होता. काही वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचं निधन झालं. त्यानंतर त्यांना एकटेपणा वाटू लागला. त्यामुळे त्यांनी फिरोज या ४९ वर्षीय महिलेशी लग्न केलं. फिरोज या देखील पतीच्या निधनानंतर एकट्याच होत्या. त्यामुळे त्यांनी आणि हबीब नजर यांच्याशी निकाह केला. हबीब नजर यांची काळजी घेण्यासाठी कुणीही नव्हतं म्हणून मी त्यांच्याशी निकाह केला असं फिरोज यांनी सांगितलं आहे.
Habib Nazar, 103, got married to 49-year-old Firoz Jahan. pic.twitter.com/DAHn4GDqsY
— Suyash S (@SuyashS5) January 29, 2024
सोशल मीडियावर (Social Media) सध्या या जोडप्याचा फोटो आणि व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतो आहे. या अनोख्या लग्नाची चर्चा सध्या सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये हबीब नजर हे एका रिक्षात आपल्या पत्नीसह निकाल करुन येताना दिसत आहेत. लोक हबीब नजर यांना लग्नाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. तसंच त्यांनीही मंद स्मित करत लोकांच्या शुभेच्छा स्वीकारल्या आहेत. खरं तर २०२३ मध्ये या दोघांचं लग्न झालं, मात्र ते आता व्हायरल होत आहेत.