Thursday, October 30, 2025
Happy Diwali

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मांच्या अडचणीत वाढ

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मांच्या अडचणीत वाढ

मुंबई: इंग्लंडविरुद्ध २ फेब्रुवारीपासून सुरू होत असलेल्या दुसऱ्या कसोटीआधी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा मोठ्या अडचणीत सापडला आहे. आधीच विराट कोहली आणि मोहम्मद शमी यांची कमतरता भासत असलेल्या टीम इंडियाला आता दुसऱ्या कसोटीत रवींद्र जडेजा आणि केएल राहुलशिवाय मैदानात उतरावे लागेल. चार मोठे मॅच विनर्स यांच्या अनुपस्थितीत रोहित शर्मासाठी प्लेईंग ११ची निवड करणे सोपे असणार नाही.

टीम इंडियाने याआधी पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गमावला आहे. त्यामुळे ते या मालिकेत ०-१ अशा पिछाडीवर आहेत. दुखापतग्रस्त झाल्याने केएल राहुल आणि रवींद्र जडेजा दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा भाग असणार नाहीत. मोहम्मद शमीही दुखापतग्रस्त झाल्याने सुरूवातीच्या दोन सामन्यात तो टीम इंडियात खेळणार नाही. तर विराट कोहली खाजगी कारणामुळे मालिकेतील पहिले दोन सामने खेळण्यासाठी उपलब्ध नाही. या दिग्गज खेळाडूंच्या स्थानी दुसऱ्या कसोटीत दोन युवा खेळाडूंना पदार्पण करण्याची संधी मिळू शकते.

दिग्गज क्रिकेटपटूंची कमतरता भासणार?

टीम इंडियाच्याला बॅटिंग ऑर्डरमध्ये केएल राहुलची कमतरता भासणार आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत राहुलने मधल्या फळीतील जबाबदारी सांभाळली होती. आफ्रिकेविरुद्ध शतक ठोकल्यानंतर राहुलचा शानदार फॉर्म कायम ठेवला आणि इंग्लंडविरुद्ध पहिल्या डावात ८६ डावांची शानदार खेळी केली.

रवींद्र जडेजा बॉलसोबत बॅटिंगमध्येही कमाल करत आहे. भारतातकडून जडेजाने सर्वाधिक ८७ धावांची खेळी केली होती. इतकंच नव्हे तर रवींद्र जडेजाने इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीच्या दोन डावांत ५ विकेट मिळवले होते.

विराट कोहलीची कमतरताही टीम इंडियाला भासणार आहे. विराट कोहली मैदानात असताना प्रेक्षकांमध्ये उत्साह असतो. याच कारणामुळे संघाला सपोर्ट मिळतो.

Comments
Add Comment