Saturday, April 26, 2025
Homeताज्या घडामोडीPushkar Jog : बीएमसी कर्मचाऱ्यांना लाथा घालण्याची भाषा करणाऱ्या पुष्कर जोगने मागितली...

Pushkar Jog : बीएमसी कर्मचाऱ्यांना लाथा घालण्याची भाषा करणाऱ्या पुष्कर जोगने मागितली माफी

काय होतं ‘ते’ वादग्रस्त वक्तव्य?

मुंबई : सध्या मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) पार्श्वभूमीवर महापालिकेचे कर्मचारी (BMC employees) घरोघरी जाऊन सर्वेक्षण (Survey) करत आहेत. प्रत्येकाला काही प्रश्न विचारुन माहिती गोळा केली जात आहे. अभिनेता पुष्कर जोगच्या (Pushkar Jog) घरीही दोन बीएमसी महिला कर्मचारी सर्वेक्षणासाठी गेल्या होत्या. यावेळेस त्यांनी पुष्करला जातीबद्दल विचारणा केली. मात्र, ही गोष्ट पुष्करला खपली नाही आणि त्याने सोशल मीडियावर (Social Media) एक स्टोरी लिहिली. त्याच्या या स्टोरीमुळे तो वादाच्या भोवऱ्यात अडकला. मात्र, लगेचच त्याने माफी मागत हा विषय थांबवला आहे.

पुष्कर जोगने जात विचारणाऱ्या महिला बीएमसी कर्मचाऱ्यांवर वैतागून लिहिले होते की, “काल बीएमसीचे काही कर्मचारी माझ्या घरी आले आणि मला सर्व्हे करतोय अशी माहिती देऊन माझी जात विचारत होते. त्या कर्मचारी जर बाईमाणूस नसत्या, तर २ लाथा नक्कीच मारल्या असत्या…कृपया करुन मला हा प्रश्न पुन्हा विचारू नका नाहीतर जोग बोलणार नाहीत डायरेक्ट कानाखाली मारतील. #जोगबोलणार,” अशी पोस्ट त्याने रविवारी केली होती.

पुष्कर जोगच्या पोस्टमुळे चांगलाच वाद झाल्याचं पाहायला मिळालं. पालिका कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. इतकंच नाही तर पुष्कर जोगवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी केली होती. तसेच काही मराठी कलाकारांनीही याबाबत नाराजी दर्शवली. यानंतर पुष्करने शेअर केलेल्या पोस्टबाबत दिलगीरी व्यक्त केली.

पुष्कर जोगने लिहिले की, “मी रविवारी एक पोस्ट केली होती. ज्या पोस्टचा हेतू हा फक्त आणि फक्त हेच सांगण्याचा होता की, मी केवळ माणुसकी हाच धर्म मानतो. अर्थात व्यक्त होताना बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल जे विधान माझ्याकडून गेलं त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो. कारण ते कर्मचारी त्यांना दिलेलं काम करत होते. वैयक्तिक बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल माझ्या मनात आदराचीच भावना आहे. माझ्या विधानामुळे ते दुखावले गेले असतील तर पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो,” असं पुष्करने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -