इम्रान खान यांना १० वर्षांची शिक्षा

नवी दिल्ली : पाकिस्तानमधील पीटीआय पक्षाचे संस्थापक, माजी पंतप्रधान इम्रान खान आणि माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांना मंगळवारी सायफर प्रकरणात १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.


सत्तेत असताना राजकीय हेतूने गोपनीय डिप्लोमॅटिक केबलचा (सायफर) गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. यानुसार ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयाने त्यांना ही शिक्षा सुनावली आहे.


पाकिस्तानमध्ये ८ फेब्रुवारीला गुरुवारी मतदान होत आहे, यापूर्वी इम्रान खान यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. इम्रान खान (७१) आणि कुरेशी (६७) यांना रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगात ठेवण्यात आले आहे.


गेल्या वर्षी मार्चमध्ये वॉशिंग्टनमधील पाकिस्तानच्या दूतावासाने पाठवलेल्या गुप्त डिप्लोमॅटिक केबलची सामग्री उघड करून अधिकृत गुप्त कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या प्रकरणात त्यांना अटक झाली होती. इम्रान खान यांची एप्रिल २०२२ मध्ये अविश्वास ठरावाद्वारे पंतप्रधान पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती.

Comments
Add Comment

पाकिस्तानमध्ये टोमॅटो ६०० रुपये किलो, मोफत मिळणारी कोथिंबीरही ५० रुपयांना

इस्लामाबाद : अफगाणिस्तान सोबतच्या संघर्षाचा फटका आता पाकिस्तानला बसू लागला आहे. देशात टोमॅटोच्या किंमती

‘मांजरांचे बेट’ अशी ओळख असलेलं अनोखं ठिकाणं

टोकियो : जगात अनेक रहस्यमय आणि अनोखी ठिकाणे आहेत; पण जपानमधील एका बेटाने आपल्या वैशिष्ट्यांमुळे पर्यटकांना

मेट्रोत झोपलात, तर भरावा लागेल हजारोंचा दंड!

दुबई : दररोज असंख्य लोक रेल्वेप्रमाणेच मेट्रोने प्रवास करतात आणि प्रवास म्हटलं की थोडी झोप आलीच. पण मेट्रो

ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य! युक्रेन विरूद्ध रशिया युद्धासंबंधी चीनसोबत करणार चर्चा

अमेरिका: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच चीनवर शंभर टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली

तब्बल ५ हजार ५०० किलो वजनाची सोन्याची बुद्ध मूर्ती!

थायलंड  : बुद्धांचे अनुयायी जगभरात अब्जावधींच्या संख्येने आहेत, जे अनेक देशांमध्ये पसरलेले आहेत. भगवान

मेट्रोत झोपलात, तर भरावा लागेल हजारोंचा दंड!

दुबई  : दररोज असंख्य लोक रेल्वेप्रमाणेच मेट्रोने प्रवास करतात आणि प्रवास म्हटलं की थोडी झोप आलीच. पण मेट्रो