Monday, June 16, 2025

सोलापुरात टूव्हीलर झाडाला आदळल्याने मोठा अपघात, ३ मित्रांचा जागीच मृत्यू

सोलापुरात टूव्हीलर झाडाला आदळल्याने मोठा अपघात, ३ मित्रांचा जागीच मृत्यू

सोलापूर: सोलापूरमध्ये एक दुचाकी झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात ३ तरूण मित्रांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सोलापूर शहरातील महावीर चौकात ही दुर्घटना घडली. या तरुणांच्या मृत्यूने येथील परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.


इरण्णा मठपती(वय २४), निखिल कोळी(वय २४), दिग्विजय सोमवंशी(वय २१) अशी या अपघातात मृत व्यक्तींची नावे आहेत. हे तिघेही एकाच टूव्हीलरवर हहोते.


महावीर चौकातील एका झाडावर मध्यरात्रीच्या सुमारास या तिघांच्या दुचाकीने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की या अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले. यावेळी बेशुद्ध झालेल्या या तिघाही मित्रांना पोलिसांनी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.


मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास हे तिघेही मित्र टूव्हीलरवरून जात होते. याचवेळेस सोलापुरात महावीर चौकात रस्त्यावर भीषण अपघात झाला. झाडाला या टूव्हीलरची धडक बसली. यात या मित्रांचा अपघात झाला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा