Thursday, July 10, 2025

Pariksha Pe Charcha: परीक्षा पे चर्चा दरम्यान मोदींचा विद्यार्थ्यांना सल्ला, रील्स बघण्यात वेळ घालवू का, भरपूर झोप घ्या

Pariksha Pe Charcha: परीक्षा पे चर्चा दरम्यान मोदींचा विद्यार्थ्यांना सल्ला, रील्स बघण्यात वेळ घालवू का, भरपूर झोप घ्या

नवी दिल्ली: परीक्षा पे चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विद्यार्थ्यांना अनेक मोलाचे सल्ले दिले. त्यांनी मुलांशी बातचीत केली. यावेळेस पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांना रील्स बघण्यात वेळ घालवू नका असाल सल्ला दिला. ते म्हणाले, मुलांनो रील्स पाहण्यात आपला वेळ वाया घालवू नका. आपल्या अभ्यासावर लक्ष द्या. त्यांनी या वयात भोजन आणि झोपेचे संतुलन बनवणे गरजेचे असते. मुलांनी भरपूर झोप घेतली पाहिजे. केवळ मोबाईल नाही बघितला पाहिजे.


मोदी पुढे म्हणाले, अनेक लोक तासनतास मोबाईल बघत असतात. मुलांना सांगितले की मोबाईल पाहण्याची एक वेळ ठरवा. प्रत्येक वेळेस मोबाईल पाहणे गरजेचे नसते. याशिवाय आपला स्क्रीन टाईम ठरवा. नाहीतर घरच्यांना वाटेल की हा मित्रांसोबत आहे अथवा रील्स पाहत आहे.


मोबाईलला जशी रिचार्ज करण्याची गरज पडते. तसेच शरीरालाही रिचार्ज करावे लागते. ही शरीराची गरज आहे. ते मुलांना म्हणाले की, केवळ अभ्यास एके अभ्यासच करायचा नाही. खेळत तर खेळतच राहायचे नाही. असे नाही केले पाहिजे. जीवनात संतुलन बनवणे महत्त्वाचे असते. यासाठी स्वस्थ शरीर, स्वस्थ मन गरजेचे. कधी कधी सूर्यप्रकाशात बसून अभ्यास करा.



शिक्षकांकडे केले अपील


पंतप्रधान मोदींनी शिक्षकांनाही अपील केले.ते म्हणाले, शिक्षकांनी हे समजले पाहिजे की त्यांचे नाते केवळ अभ्यासक्रम अथवा विषयापर्यंतच असू नये. त्यांनी मुलांसोबत असे नाते बनवले पाहिजे यामुळे मुलांचा विश्वास कमावता येईल.

Comments
Add Comment