Tuesday, July 16, 2024
Homeताज्या घडामोडीMonalisa Painting : पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी मोलानिसाच्या जगप्रसिद्ध तैलचित्रावर फेकलं सूप!

Monalisa Painting : पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी मोलानिसाच्या जगप्रसिद्ध तैलचित्रावर फेकलं सूप!

महिला कार्यकर्त्यांनी यामागील कारण सांगितले, म्हणाल्या…

पॅरिस : इतिहासातील अत्यंत प्रसिद्ध चित्रकार लिओनार्डो द व्हिंची (Leonardo da Vinci) याने काढलेले मोनालिसाचे चित्र (Monalisa Painting) जगप्रसिद्ध आहे. आजवर प्रत्येकाने एकदा तरी हे चित्र पाहिले असेल. हे मूळ चित्र सध्या पॅरिसच्या (Paris) लूवर संग्रहालयात (Louvre Museum) संग्रहित ठेवण्यात आले आहे. मात्र, काल या चित्रावर पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी (Environmental acitivists) सूप फेकलं. संग्रहालयातील सुरक्षा चुकवून दोन महिला आतमध्ये शिरल्या व त्यांनी हे कृत्य केलं. चित्रासमोर बुलेटप्रूफ काच असल्याने सुदैवाने चित्राला कोणतीही हानी पोहोचलेली नाही. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Social Media Viral) होत आहे.

ज्या दोन महिलांनी हे कृत्य केलं त्या पर्यावरणवादी कार्यकर्त्या आहेत. उपस्थित सुरक्षा कर्मचाऱ्यांनी घडल्या प्रकारानंतर चित्रासमोर काळ्या रंगाचा स्क्रिन लावला होता. या प्रकरणी संग्रहालयाने पोलिसात तक्रार केली आहे.

महिला कार्यकर्त्यांचं म्हणणं काय?

दोन महिला कार्यकर्त्यांनी सरकार तसंच प्रशासनाला प्रश्न विचारला की, ‘अधिक महत्त्वाचं काय आहे कला की निरोगी आणि योग्य अन्नप्रणाली? कृषी व्यवस्था खराब आहे, शेतकरी काम करताना मरत आहेत. त्यामुळे पर्यावरण तसंच अन्न स्रोतांची गरज अधोरेखित व्हावी यासाठी आम्ही हे आंदोलन केलं’, असं या पर्यावरणवादी महिला कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.

या दोन्ही कार्यकर्त्या रिपोस्टे एलिमेंटेअर या फ्रेंच संघटनेचे प्रतिनिधीत्व करत होत्या. या आंदोलनानंतर कार्यकर्त्यांनी एक निवेदन जारी करत, पर्यावरण आणि अन्न स्त्रोताची गरज अधोरेखित व्हावी म्हणून हा निषेध करण्यात आल्याचे म्हटले.

याआधीही मोनालिसाच्या चित्रावर झाला होता हल्ला

याआधी एका २०२२ च्या आंदोलनादरम्यान मोनालिसाच्या चित्रासमोरची काच दाबण्यात आली होती. तसंच ऑक्टोबर २०२२ मध्ये लंडन येथील नॅशनल व्हिन्सेंट व्हॅन गॉगच्या सूर्यफुलाच्या चित्रावर सूप फेकण्यात आले होते. इंधनाच्या वाढत्या किंमती, धोरणांमध्ये झालेले बदल यांचा निषेध करत नुकतीच काही शेतकऱ्यांनी फ्रान्समध्ये निदर्शनं केली होती. त्यानंतर आता मोनालिसाच्या चित्रावर सूप फेकण्याची घटना समोर आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -