
मुंबई : अटल सेतूचे (Atal Setu) १२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या सेतूमुळे मुंबई आणि नवी मुंबईचा प्रवास फक्त १५ ते २० मिनिटांवर आला आहे. हा सेतू सुरु झाल्यापासून लोकांमध्ये याची प्रचंड क्रेझ आहे. अनेकजण केवळ फेरफटका मारायला अटल सेतूवर जातात आणि त्याचे फोटो काढून सोशल मीडियावर शेअर करतात. त्यामुळे अटल सेतूवर प्रवास करण्यासाठी अधिकाधिक लोक उत्सुक बनत चालले आहेत.
अटल सेतूवर वाहन थांबवून सेल्फी काढण्याची परवानगी नसल्यामुळे असे सेल्फी काढणार्यांकडून चांगलाच दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच गेल्या दहा दिवसांत या सेतूवरुन ३ लाखांहून अधिक वाहनांनी प्रवास केला आहे. यामधून तब्बल ६ कोटी रुपये टोलवसुली झाली आहे. येत्या काळात अटल सेतूवर अधिक गर्दी होण्याची शक्यता आहे.