Tuesday, October 28, 2025
Happy Diwali

Narayan Rane : मराठा आरक्षणाबाबत सरकारच्या अध्यादेशाला केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा विरोध

Narayan Rane : मराठा आरक्षणाबाबत सरकारच्या अध्यादेशाला केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा विरोध

म्हणाले, मराठा समाजाचे खच्‍चीकरण...

मुंबई : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या लढ्याला अखेर काल यश आले. राज्य सरकारने मराठा समाजाच्या (Maratha Samaj) सर्व मागण्या मान्य केल्या. त्यामुळे उपोषणकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उपोषण सोडले. मात्र, सरकारच्या या अध्यादेशाला केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी विरोध दर्शवला आहे. आपल्या एक्स अकाऊंटवरुन एक पोस्ट करत त्यांनी हा विरोध नोंदवला आहे.

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी सरकारमधीलच काही नेत्यांचा प्रखर विरोध होता. त्यामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे देखील ओबीसीतील कुणबी प्रमाणपत्र मराठ्यांना देण्याच्या विरोधात होते. त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'नारायण राणे एक्सवर पोस्ट करत म्हणाले, मराठा समाज आरक्षणासंबंधी राज्‍य सरकारने घेतलेल्‍या निर्णयाशी आणि दिलेल्‍या आश्‍वासनाशी मी सहमत नाही. यामध्ये ऐतिहासिक परंपरा असलेल्‍या मराठा समाजाचे खच्‍चीकरण आणि इतर मागास समाजावर अतिक्रमण होणार असल्‍याने राज्यात असंतोष निर्माण होऊ शकतो.' सोबतच उद्या पत्रकार परिषद घेऊन याविषयी सविस्तर बोलेन, अशी माहिती नारायण राणे यांनी दिली आहे.

Comments
Add Comment