Bigg Boss मध्ये आतापर्यंत १६ विजेत्यांना मिळाली इतकी रक्कम...

मुंबई: बिग बॉस १७शेवटच्या टप्प्यावर आहे. २८ फेब्रुवारी म्हणजेच आज बिग बॉस १७चा ग्रँड फिनाले आहे. बिग बॉसला आपला १७वा विजेता भेटेल. बिग बॉस १७ चे टॉप ५ स्पर्धक मुनव्वर फारूकी, अंकिता लोखंडे, मनारा चोपडा, अभिषेक कुमार आणि अरूण महाशेट्टीपैकी एक होईल.

बिग बॉस १६च्या विजेत्यांना मिळाली इतकी बक्षिसांची रक्कम


२००६मध्ये बिग बॉसचा पहिला सीझन आला होता याला अर्शद वारसीने होस्ट केले होते. यानंतर हा शो शिल्पा शेट्टी, अमिताभ बच्चन, संजय दत्त या कलाकारांनी होस्ट केले होते. २०१० पासून सलमान खान हा शो होस्ट करत आहे. एका न्यूज एजन्सीच्या माहितीनुसार, बिग बॉसच्या १ ते १६ हंगामातील विजेत्यांना काय बक्षीस मिळाले ते घ्या जाणून...

राहुल रॉय


बॉलिवूड अभिनेता राहुल रॉयने आपल्या एक ब्लॉकबस्टर सिनेमा आशिकी दिला होता. राहुल बिग बॉसच्या पहिल्या हंगामाचा विजेता ठरला होता. त्याना बक्षीस म्हणून १ कोटी रूपये मिळाले होते.

आशुतोष कौशिक


टीव्ही अभिनेता आणि होस्ट आशुतोष कौशिकने २००७मध्ये रोडीजही जिंकले होते. बिग बॉस सीजन २चा विनरही आशुतोष बनला होता. त्याला बक्षीस म्हणून १ कोटी रूपये मिळाले होते.

विंदु दारा सिंह


बिग बॉस ३ चे विनर विंदु दारा सिंह बनले होते. विंदु यांना विनर केल्यानंतर बक्षीस म्हणून १ कोटी रूपये मिळाले होते.

श्वेता तिवारी


बिग बॉस ४ची विजेती श्वेता तिवारी बनली होती. श्वेताला विनर बनल्यानंकप ट्रॉफीसोबत १ कोटी रूपयांचे बक्षीस भेटले होते.

जुही परमार


बिग बॉस ५ ची विनर जुही परमार बनली होती. जुहीला विनर बनल्यानंतर १ कोटी रूपयांचे बक्षीस मिळाले होते.

उर्वशी ढोलकिया


टीव्हीची खलनायिका उर्वशी ढोलकियाने बिग बॉस ६ची ट्रॉफी जिंकली होती. यानंतर तिला ५० लाख रूपये बक्षीस मिळाले होते.

गौहर खान


अभिनेत्री आणि मॉडेल गौहर खानने बिग बॉसच्या ७व्या हंगामात विजय मिळवला होता. तिला बक्षीस म्हणून ५० लाख रूपये मिळाले होते.

गौतम गुलाटी


बिग बॉस ८चा विनर गौतम गुलाटी ठरला होता. त्याला बक्षीस म्हणून ५० लाख रूपये मिळाले होते.

प्रिन्स नरूला


टीव्ही अभिनेता प्रिन्स नरूला बिग बॉस ९चा विनर होता. त्याला विनर बनल्यानंतर ५० लाख रूपयांचे बक्षीस मिळाले होते.

मनवीर गुर्जर


बिग बॉस १०चा विनर मनवीर गुर्जर प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याला विनर बनल्यानंतर ५० लाख रूपये बक्षीस मिळाले होते.

शिल्पा शिंदे


शिल्पा शिंदे बिग बॉस ११ची विनर बनली होती. त्यानंतर अभिनेत्रीला ५० लाख रूपये बक्षीस म्हणून देण्यात आले होते.

दीपिका कक्कर


बिग बॉस १२ची विनर दीपिका कक्कर आहे. ती विनर बनल्यानंतर दीपिकाला ३० लाख रूपये बक्षीस मिळाले होते.

सिद्धार्थ शुक्ला


टीव्हीचा प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्ला आपल्यात राहिला नाही. बिग बॉस १३चा विनर बनलेल्या सिद्धार्थ शुक्लाला ५० लाख रूपये मिळाले होते.

रुबीना दिलैक


बिग बॉस १४ची विनर रुबीना दिलैक आहे तिला विनर बनल्यानंतर ३६ लाख रूपये मिळाले होते.

तेजस्वी प्रकाश


बिग बॉस १५ची विजेती तेजस्वी प्रकाश आहे. तिला बक्षीस म्हणून २५ लाख रूपये मिळाले होते.

एमसी स्टॅन


बिग बॉस १६चा विजेता एमसी स्टॅन प्रोफेशनल रॅपर आहे. बिग बॉस १६चा विनर बनल्यानंतर स्टॅन ३१.८० लाख रूपये मिळाले होते.
Comments
Add Comment

‘दशावतार’ सिनेमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; २ दिवसांत केली इतकी कमाई !

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळीच लाट घेऊन आलेल्या ‘दशावतार’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच

रजनीकांत होते 'दशावतार'साठी पहिली पसंत? दिग्दर्शकांचा मोठा खुलासा

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एका चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. तो चित्रपट म्हणजे 'दशावतार'! हा चित्रपट

दिशा पटानीच्या घरावर गोळीबार!

प्रेमानंद महाराजांचा अपमान केल्याच्या आरोपाखाली केला गोळीबार बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीशी संबंधित एक

TMKOC : ४५०० भागांचा टप्पा गाठत ‘तारक मेहता’ने रचला नवा विक्रम

मुंबई : टीव्ही मनोरंजनाच्या विश्वात लोकप्रिय मालिकांचा उल्लेख झाला, तर ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेचं

‘तू माझा किनारा’ – क्रिस्टस स्टीफन यांची मराठी चित्रपटसृष्टीत भावनिक सुरुवात!

मुंबई : चित्रपट निर्माते क्रिस्टस स्टीफन हे आता मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत असून, त्यांचा पहिला मराठी

अभिनेत्री करिश्माने मारली चालत्या लोकलमधून उडी

मुंबई : लोकप्रिय अभिनेत्री करिश्मा शर्मा हिचा मुंबईतील चर्चगेट येथे अत्यंत गंभीर अपघात झाला. करिश्मा स्वतःने