Monday, May 19, 2025

मजेत मस्त तंदुरुस्तताज्या घडामोडी

Health: दुधासोबत करा या गोष्टींचे सेवन, शरीराला मिळेल दुप्पट ताकद

Health: दुधासोबत करा या गोष्टींचे सेवन, शरीराला मिळेल दुप्पट ताकद

मुंबई: आपल्या देशात अनेक दशकांपासून नैसर्गिक गोष्टींनी उपचार केले जातात. आपल्या घरातील किचनमध्येही असे अनेक मसाले तसेच खाद्यपदार्थ आहेत जे आपल्या आरोग्यासाठी लाभदायक असतात. आज आम्ही तुम्हाला दूध-तूप पिण्याचे फायदे सांगणार आहोत.


जर तुम्ही दुध-तुपात चिमूटभर हळद मिसळाल तर यामुळे केवळ तुम्हाला ताकदच मिळणार नाही तर अनेक प्रकारचे आरोग्याचे फायदेही होतील. देशी तूप हे अतिशय पौष्टिक आणि पित्त दोष संपवणारे मानले जाते. तूप जर गायीचे असेल तर याचे लाभ अधिक होतात. याशिवाय दुधाला संपूर्ण आहार मानले जाते. हळदीमध्ये अँटी बायोटिक गुण असतात यामुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते आणि आजारांचा धोका कमी होतो.


हळद, दूध, आणि देशी तुपाचा वापर जुन्या कालखंडापासून केला जात आहे. याचे स्वरूप उष्ण असते यामुळे मुका मार लागल्यास, हांडामध्ये दुखणे असल्यास हे प्यायले जाते. हळद, दूध आणि तूप यांचे आरोग्यास अनेक लाभही होतात. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते.



दररोज हळद, दूध आणि तुपाच्या सेवनाचे फायदे


दुधामध्ये कॅल्शियम असते आणि तूप सांधेदुखीमध्ये लुब्रिकेशनचे काम करते. हळदीमध्ये करक्युमिन नावाचे कंपाऊंड असते ज्यात इन्फ्लामेंटरी गुण असतात. याच कारणामुळे तिघांचे मिश्रण हाडे मजबूत करण्याचे काम तसेच सांधेदुखीपासून सुटका होते.


तसेच रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्याचे कामही करते. या मिश्रणामुळे कोणत्याही प्रकारच्या संक्रमणाासून शरीराचा बचाव होतो.

Comments
Add Comment