Thursday, September 18, 2025

Police Academy: चार राज्यातील आदिवासी युवा युवतींची महाराष्ट्र पोलीस अकॅडमीला भेट

Police Academy: चार राज्यातील आदिवासी युवा युवतींची महाराष्ट्र पोलीस अकॅडमीला भेट

नाशिक प्रतिनिधी: नेहरू युवा केंद्र नाशिक अंतर्गत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यापीठ येथे झारखंड, उडीसा, आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यातून आलेल्या 200 आदिवासी युवक युवतींचे प्रशिक्षण कार्यक्रम सुरू असुन आज त्यांनी महाराष्ट्र पोलीस अकॅडमीला भेट दिली. प्रसंगी त्यांनी पोलीस प्रशिक्षण कार्यक्रम नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकॅडमीच्या स्थापनेपासून आजवरचा प्रवास याची माहिती जाणून घेत. म्युझियमला भेट देऊन म्युझियम मधील विविध स्थित्यंतरानुसार बदलणाऱ्या बंदूक, रायफल, वर्दी, पोस्टिंग नुसार बदलणारे स्टार्स, ड्रेस कोड यांची माहिती जाणून घेतली.

तसेच आजवर नाशिक पोलिसांनी केलेल्या विविध कारवायांची माहिती जाणून घेतली. प्रसंगी त्यांचे सात वेगवेगळे गट तयार करण्यात आले होते. त्यांना वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी पोलीस प्रशिक्षण कार्यक्रम व आजवरच्या प्रवासाची माहिती दिली. सदर अभ्यास भेट महाराष्ट्र पोलीस अकॅडमीचे संचालक, उपसंचालक तसेच नेहरू युवा केंद्र राज्य निदेशक प्रकाश मनोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. प्रसंगी पोलीस निरीक्षक एस बावस्कर, जिल्हा युवा अधिकारी कमल त्रिपाठी, राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते मोहम्मद अरिफ खान उपस्थित होते सदर कार्यक्रमाचा यशस्वीतेसाठी नितीन रायते, महेश बोरसे, राजेंद्र महाले, विशाल थोरात, किरण चव्हाण, समाधान भामरे आदींनी परिश्रम घेतले.

Comments
Add Comment