मुंबई: थंडीच्या दिवसात बाजारात मोठ्या प्रमाणात भाज्या येतात. पालकाची भाजीही बाजारात मोठ्या प्रमाणात दिसते. तुम्हीही थंडीच्या दिवसात पालक मोठ्या प्रमाणात खाता का?
प्रोटीन, फायबर आणि कार्बोहायड्रेटने भरपूर पालकाचे सेवन थंडीच्या दिवसांत केले जाते. पालकाला सुपरफूडही म्हटले जाते. यात व्हिटामिन सी, आर्यन आणि कॅल्शियमसारखी पोषकतत्वे मोठ्या प्रमाणात असतात.
थंडीच्या दिवसांत दररोज पालक खाल्ल्याने शरीरास अनेक फायदे होतात. पालक हे व्हिटामिन आणि मिनरल्ससह अनेक पोषकतत्वांचे भंडार आहे जे शरीराला हेल्दी बनवतात.
पालकामध्ये अँटी ऑक्सिडंट गुण मोठ्या प्रमाणात आढळतात. अँटी ऑक्सिडंटमुळे आपल्या शरीराच्या पेशींना होणारे नुकसान यापासून बचाव होतो.
पालक व्हिटामिनशिवाय कॅल्शियमचाही चांगला स्त्रोत आहे. यामुळे हाडे मजबूत होतात. पालकामध्ये जॅक्सेन्थिन आणि ल्युटिन मोठ्या प्रमाणात असते जे डोळ्यांचा मोतीबिंदूपासून बचाव करता. तसेच डोळ्यांचे आरोग्य सुधारतात.
पालक पुरुषांमध्ये होणाऱ्या प्रोस्टेट कॅन्सरची शक्यता कमी करतात. याशिवाय ब्रेस्ट कॅन्सरपासूनही बचाव करतात. पालक हे लो कॅलरी आणि हाय फायबर फूड आहे. यामुळे भूक शांत होण्यासोबतच पाचन तंदुरुस्त राखण्यास मदत होते.