Wednesday, July 17, 2024
Homeप्रतिबिंबचर्चेतला चेहराActor: लवकरचं आणखी एक अभिनेता होणार नेता...

Actor: लवकरचं आणखी एक अभिनेता होणार नेता…

दक्षिणेचा लोकप्रिय अभिनेता थलापती विजय (Thalapathy Vijay) लवकरच कमल हसन आणि रजनीकांत यांच्या पावलावर पाऊल ठेवणार आहे. थलापती विजयचे निकटवर्तीय मानले जाणारे विजय मक्कल इयक्कम यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी याबाबतचा निर्णय येणं अपेक्षित आहे. या संदर्भात 25 जानेवारीला एक बैठकही पार पडली. या बैठकीत नव्या पक्षाची स्थापना करण्यावर एकमत झालं. दक्षिणेत (South) थलापती विजयचा मोठा फॅन फॉलोईंग आहे. याशिवाय सामाजिक कार्यातही थलापती विजय आघाडीवर असतो. त्यामुळे त्याला मानणारा एक मोठा वर्ग आहे. याचा त्याला राजकारणात फायदा होऊ शकतो.

जोसेफ विजय चंद्रशेखर हे तमिळ चित्रपट अभिनेते (तसेच त्यांनी पार्श्वगायन देखील केले आहे.) आहेत. १९९२ सालापासून ते अभिनय क्षेत्रात काम करीत आहेत. सध्या ते तमिळ चित्रपट सृष्टीत आघाडीचे यशस्वी नायक आहेत. त्यांना लोक थलापती विजय या नावाने ओळखतात. ते साहसी दृश्यांसाठी प्रसिद्ध आहेत.

यााआधी थलापती विजयचा तामिळनाडूतल्या राजकीय कार्यक्रम आणि स्थानिक निवडणुकांमध्ये सक्रिय सहभाग पाहिला मिळालाय. सोशल मीडियावरही थलापती विजयचे लाखोंनी फॉलोअर्स आहेत. त्यामुळे विजयची राजकारणात कशी सुरुवात होते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दक्षिण चित्रपटसृष्टीत थलापती विजयने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्याच्या अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केलीय. 2018 मद्ये थुथ्कुडी इथल्या पोलीस गोळीबाराच्या घटनेनंतर थलापती विजयचा राजकारणात वावर वाढला. थलापती विजय 2026 मध्ये राजकारणात प्रवेश करेल अशी शक्यता वर्तवली जात होती. पण त्याआधीच म्हणजे याचवर्षी लोकसभा निवडणूकीपूर्वी राजकारणात एन्ट्री करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -