Monday, July 22, 2024
Homeताज्या घडामोडीसफरचंद, संत्रे, केळे या सर्वांना मात देते हे छोटेसे फळ, वाचल्यावर आजच...

सफरचंद, संत्रे, केळे या सर्वांना मात देते हे छोटेसे फळ, वाचल्यावर आजच कराल खाण्यास सुरूवात

मुंबई: फळे आपल्या शरीरासाठी किती महत्त्वाची आहेत हे आपण सारेच जाणतो. यासाठी तज्ञही सांगतात की कमीत कमी २ ते ३ फळांचे सेवन दररोज केले पाहिजे. मात्र बरेच जण काही ठराविक फळेच खातात जसे सफरचंद, संत्री अथवा केळी. मात्र आरोग्य तज्ञांच्या मते निळ्या रंगाचे हे छोटेसे फळ जगातील बेस्ट फ्रुटपैकी एक आहे. याला ब्लूबेरी असे म्हटले जाते.

ब्लूबेरी केवळ खाण्यासाठीच स्वादिष्ट नाही आहे तर हृदयाच्या आरोग्यापासून ते कँसर तसेच स्ट्रोकचा धोकाही कमी करतात. जाणून घेऊया ब्लू बेरीचे फायदे

अँटी ऑक्सिडंट भरपूर

ब्लू बेरीमध्ये अँटी ऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असतात. खासकरून यात अँथोसायनिनसारखे फ्लॅवेनाईड्स असतात जे शरारीला हानिकारक फ्री रॅडिकल्सपासून वाचवतात. हे अँटी ऑक्सिडंट्स पेशींना ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून वाचवतात. यामुळे कँन्सर तसेच हार्टच्या आजारांचा धोका कमी होतो.

हृदय अॅक्टिव्ह ठेवतात.

ब्लूबेरीमध्ये अँटीऑक्सिडंट असल्याने त्यांच्या इन्फ्लामेंटरी गुणांसह सूज कमी करणे तसेच ब्लड फ्लोमध्ये सुधारण्याचे काम करत हेल्दी हार्ट बनवण्याचे काम करतात. ब्लू बेरीच्या नियमित सेवनाने ब्लड प्रेशर कमी करणे तसेच एलडीएल कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी कऱण्यास मदत होते.

चांगल्या पाचनासाठी फायदेशीर

ब्लू बेरी डाएटरी फायबरचा एक चांगला स्त्रोत आहे. जे बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ देत नाही. तसेच पाचनसंस्थेला सुधारतो. याशिवाय पोटासंबंधीचे आजार दूर होण्यास मदत होते.

ब्लू बेरीमध्ये आढळणारे अँटी ऑक्सिडंट ल्यूटिन आणि जॅक्सेन्थिन वयाशी संबंधित डोळ्यांचे आरोग्य, मोतिबिंदूपासून बचाव तसेच डोळ्यांच्या आरोग्यात महत्त्वपूर्ण भूमिका साकारतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -