मुंबई: गुरूवारी केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली. हिंदी सिनेमाच्या दिग्गज अभिनेत्री वैजयंती माला आणि दाक्षिणात्या सुपरस्टार चिरंजीव यांना पद्म विभूषण पुरस्कार जाहीर झाला. तर दिवंगत विजयांत सह बॉलिवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती आणि उषा उथुप यांना पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित केले जाईल.
एका न्यूज एजन्सीशी बोलताना मिथुन चक्रवर्ती यांनी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, खूप आनंद, ही एक अशी भावना आहे जी मी व्यक्त करू शकत नाही. बऱ्याच त्रासानंतर इतका मोठा सन्मान मिळतो त्याचा आनंद काही वेगळाच असतो. मी सर्वांचे आभार मानतो मला हा सन्मान दिल्याबद्दल. मिथुन पुढे म्हणाले, मी हा सन्मान देश आणि संपूर्ण जगभरातील माझ्या चाहत्यांना अर्पण करतो ज्यांनी मला निस्वार्थ प्रेम दिले. थँक्यू मला इतके प्रेम दिल्याबद्दल.
असे राहिले करिअर
मिथुन चक्रवर्ती यांचा सिने इंडस्ट्रीमधील प्रवास शानदार राहिला. त्यांनी आपल्या अभिनयाची सुरूवात बंगाली सिनेमा मृगयाने केली होती.यातील त्यांच्या भूमिकेला खूप पसंती मिळाली होती. इतकंच नव्हे तर मिथुन यांना आपल्या पहिल्या सिनेमासाठी २४व्या राष्ट्रीय पुरस्कारामधील सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
बॉलिवूडमधील अनेक दमदार सिनेमे
मिथुन यांनी दोन अंजाने या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. दुलाल गुहा यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमाने त्यांच्यासाठी बॉलिवूडचे दरवाजे खोलले. यानंतर मिथुनने अनेक दमदार सिनेमे दिले. यात डिस्को डान्सर, प्यार झुकता नाही, फूल और अंगार, दलाल, प्रेम प्रतिज्ञा, जंग और चांडाल असे अनेक सिनेमे केले. त्यांचा सगळ्यात अविस्मरणीय सिनेमा अग्निपथ आहे.हीर झाला.