Sunday, July 14, 2024
Homeदेशबिहारमध्ये भाजपसोबत सरकार बनवणार नितीश कुमार - सूत्र

बिहारमध्ये भाजपसोबत सरकार बनवणार नितीश कुमार – सूत्र

पाटणा – बिहारमध्ये(bihar) राजकीय हालचालींना मोठा वेग आला आहे. पुढील २४ तास बिहारच्या राजकारणातील महत्त्वाचे आहेत. नितीश कुमार राजीनामा देऊ शकतात. ते भाजपसोबत जात आपले सरकार बनवू शकतात. २८ जानेवारीला नितीश यांचा शपथग्रहण विधी होऊ शकतो. उपमुख्यमंत्री भाजपचे सुशील मोदी बनू शकतात.

सूत्रांच्या माहितीनुसार जदयू-भाजपसोबत आल्याने नीतीश कुमार मुख्यमंत्री बनत आहेत. तर उपमुख्यमंत्री भाजपचे सुशील मोदी असतील. असेही म्हटले जात आहे की भाजपकडून दोन उपमुख्यमंत्री बनू शकतात. विधानसभा आणि लोकसभा निवडणूक एकत्र करण्याच्या शक्यतेवर बिहारच्या भाजप नेत्यांनी समर्थनार्थ आपले मत मांडलेले नाही. सूत्रांच्या मते लोकसभेसोबतच बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार नाही.

बिहारच्या राजकारणात झालेली हालचातल आणि नितीश कुमार भाजपसोबत जाण्याच्या चर्चांमुळे सध्या पक्ष सार्वजनिकरूपाने आपले पत्ते खोलण्यास तयार नाही. पाटणामध्ये झालेल्या राजकीय घमासानदरम्यान भाजपा अलकमानने बिहार भाजपच्या नेत्यांना बैठकीसाठी दिल्लीत बोलावले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी ही उच्चस्तरीय बैठक पार पडली. शाह यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत अमित शाह आणि जेपी नड्डा यांनी बिहार भाजप नेत्यांसोबत पावणे दोन तास विचारमंथन केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -