
जाणून घ्या कोण कोण ठरले यंदाचे मानकरी? वाचा संपूर्ण यादी
नवी दिल्ली : केंद्र सरकारने (Central Government) गुरुवारी देशाचा दुसरा-सर्वोच्च नागरी सन्मान पद्म पुरस्कार २०२४च्या (Padma Awards 2024) विजेत्यांची यादी जाहीर केली. पद्म पुरस्कारांमध्ये पद्मश्री (Padmashri), पद्मभूषण (Padma Bhushan) आणि पद्मविभूषण (Padma Vibhushan) असे पुरस्कार जाहीर केले जातात. पंतप्रधानांनी दरवर्षी स्थापन केलेल्या पद्म पुरस्कार समितीने केलेल्या शिफारशींवर हे पुरस्कार दिले जातात. यंदाच्या पद्म पुरस्कारांची नावे प्रजासत्ताक दिनाच्या (Republic day) पूर्वसंध्येला जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये विविध क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या नावांचा समावेश आहे.
भारत सरकारद्वारे प्रदान करण्यात येणारे प्रतिष्ठित पद्म पुरस्कार विविध क्षेत्रातील अपवादात्मक योगदानाची दखल घेतात. या वर्षी सरकारने विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल पाच प्रतिष्ठित व्यक्तींना पद्मविभूषण, १७ जणांना पद्मभूषण आणि ११० जणांना पद्मश्री पुरस्काराने (एकूण १३२) सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे.
पद्मविभूषण पुरस्काराचे मानकरी :
१. वैजयंतीमाला बाली: कला, तामिळनाडू
२. कोनिडेला चिरंजीवी: कला, आंध्र प्रदेश
३. एम व्यंकय्या नायडू: सार्वजनिक व्यवहार, आंध्र प्रदेश
४. बिंदेश्वर पाठक (मरणोत्तर): सामाजिक कार्य, बिहार
५. पद्मा सुब्रह्मण्यम : कला, तामिळनाडू
पद्मभूषण पुरस्काराचे मानकरी :
१. एम फातिमा बीवी (मरणोत्तर): सार्वजनिक व्यवहार, केरळा
२. होर्मुसजी एन कामा: साहित्य आणि शिक्षण - पत्रकारिता, महाराष्ट्र
३. मिथुन चक्रवर्ती: कला, पश्चिम बंगाल
४. सीताराम जिंदाल: व्यापार आणि उद्योग, कर्नाटक
५. यंग लिऊ: व्यापार आणि उद्योग, तैवान
६. अश्विन बालचंद मेहता: औषध, महाराष्ट्र
७. सत्यब्रत मुखर्जी: सार्वजनिक व्यवहार, पश्चिम बंगाल
८. राम: सार्वजनिक व्यवहार, महाराष्ट्र
९. तेजस मधुसूदन पटेल: औषध, गुजरात
१०. ओलंचेरी राजगोपाल: सार्वजनिक व्यवहार, केरळा
११. दत्तात्रय अंबादास मायालू उर्फ राजदत्त: कला, महाराष्ट्र
१२. तोगडन रिनपोचे (मरणोत्तर): इतर-अध्यात्मवाद, लडाख
१३. प्यारेलाल शर्मा: कला, महाराष्ट्र
१४. चंद्रेश्वर प्रसाद ठाकूर: औषध, बिहार
१५. उषा उथुप: कला, पश्चिम बंगाल
१६. विजयकांत (मरणोत्तर): कला, तामिळनाडू
१७. कुंदन व्यास: साहित्य आणि शिक्षण - पत्रकारिता, महाराष्ट्र
पद्मश्री पुरस्काराचे मानकरी
पार्वती बरुआ, जागेश्वर यादव, चामी मुर्मू, गुरविंदर सिंग, सत्यनारायण बेलारी, दुखु माझी, के. चेलम्माल, संगथनकिमा, हिमचंद मांझी, यनुंग जेमो, सोमन्ना, सर्वेश्वर बी., प्रेमा धनराज, उदय देशपांडे, वाय. इटालिया, शांती देवी पासवान आणि शिवन पासवान, रतन कहर, अशोक कुमार बी., बाळकृष्ण वेल्ली, उमा माहेश्वरी, गोपीनाथ एस., स्मृती रेखा चक्मा, ओमप्रकाश शर्मा, नारायण ईपी, कल्लू कथकली गुरू, भागवत प्रधान, एस.आर. पाल, बद्रापन एम., जॉर्डन लेप्चा, एम. सासा, जानकीलाल, डी. कोंडप्पा, बाबू राम यादव, नेपाल चंद्रा यांसह ११० जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.