Monday, May 19, 2025

महामुंबईमहाराष्ट्रताज्या घडामोडी

Samruddhi highway accident : चालकाला झोप लागल्याने समृद्धी महामार्गावर भीषण अपघात

Samruddhi highway accident : चालकाला झोप लागल्याने समृद्धी महामार्गावर भीषण अपघात

तिघांचा मृत्यू तर अपघातानंतर चालक पसार


अहमदनगर : गेल्या काही दिवसांत अपघाताच्या घटनांमध्ये (Accidents) प्रचंड वाढ झाली आहे. त्यात समृद्धी महामार्गावरील (Samruddhi highway) अपघातांचे सत्र सुरुच आहे. आज पहाटेच्या सुमारास समृद्धीवर पुन्हा एकदा अपघाताची घटना घडली आहे. चालकाला झोप लागल्याने बाजूच्या कंटेनरला धडक लागल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे.


समृद्धी महामार्गावर पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलीस स्टेशन हद्दीत अपघाताची घटना घडली. अहमदनगरहून रायपूरकडे जाणाऱ्या खासगी टेम्पो ट्रॅव्हलची बाजूच्या कंटेनरला धडक लागल्याने हा भीषण अपघात झाला.


चालकाला पहाटे झोप लागल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील वाढोना शिवणी दरम्यान चॅनल १२८ वर हा अपघात घडला. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला तर काही जण जखमी आहेत. अपघातातील जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पसार झाला. या अपघाताचा पुढील तपास तळेगाव दशासर पोलीस करत आहेत.

Comments
Add Comment