Wednesday, July 2, 2025

Manoj Jarange Patil : सैराटमुळे घराघरांत पोहोचलेला अभिनेता आता दिसणार मनोज जरांगेंवरील संघर्षयोद्धा चित्रपटात!

Manoj Jarange Patil : सैराटमुळे घराघरांत पोहोचलेला अभिनेता आता दिसणार मनोज जरांगेंवरील संघर्षयोद्धा चित्रपटात!

मोहन जोशी, जयवंत वाडकर, सुरभी हांडे... अशी तगडी स्टारकास्ट!


जालना : मराठा समाजासाठी (Maratha Samaj) उपोषण करुन मराठा समाजाला कायमस्वरुपी आरक्षण (Maratha Reservation) मिळवून देण्याच्या ध्यासाने झपाटलेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या कारकीर्दीवर आता चित्रपट येणार आहे, हे सर्वश्रुत आहे. या चित्रपटाच्या शूटिंगचा मुहूर्तदेखील जालना येथील आंतरवाली सराटी येथे पार पडला. याच ठिकाणी मराठा समाजाच्या संघर्षाची मालिका सुरु झाली व मनोज जरांगेंनी उपोषण केले होते. 'संघर्षयोद्धा' (Sangharsh yoddha)या चित्रपटात रोहन पाटील हा नवोदित अभिनेता मनोज जरांगे यांची भूमिका साकारणार आहे.


संघर्षयोद्धा या चित्रपटाविषयी आता एक विशेष बाब समोर आली आहे. काही वर्षांपूर्वी जगभरात धुमाकूळ घातलेल्या मराठी चित्रपट सैराटमधून (Sairat) घराघरातच पोहोचलेला अभिनेता संघर्षयोद्धा चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटात सल्ल्या म्हणजेच परशाचा जवळचा मित्र ही महत्त्वाची भूमिका साकारणारा अभिनेता अरबाज शेख (Arbaj Shaikh) संघर्षयोद्धा चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. सोशल मीडियावर चित्रपटाच्या शूटिंग मुहूर्ताच्या वेळचा फोटो शेअर करत त्याने ही माहिती दिली आहे.






 










View this post on Instagram























 

A post shared by Arbaj Shaikh (@arbajshaikh15)





अरबाजने या फोटोला कॅप्शन दिलं आहे की, "राज्यभर चर्चेत असणारा चित्रपट संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटात मी महत्वाची भूमिका बजावत असून या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मुख्य भूमिका बजावत असणारे रोहन पाटील यांच्या सोबतचा हा शूट लोकेशनचा फोटो." अरबाजने शेअर केलेल्या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.



कोण आहेत कलाकार मंडळी?


गोवर्धन दोलताडे यांनी 'संघर्षयोद्धा' या चित्रपटाची कथा आणि निर्मिती केली आहे. या चित्रपटाची पटकथा आणि संवाद सुधीर निकम यांनी लिहिले आहेत. या चित्रपटात अभिनेत्री सुरभी हांडे, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, जयवंत वाडकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. येत्या २६ एप्रिल २०२४ रोजी 'संघर्षयोद्धा' हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन शिवाजी दोलताडे यांनी केलं आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा