महाराष्ट्रातल्या ७८ पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर
नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनानिमित्ताने देशभरातल्या एकूण ७५३ अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. यामध्ये महाराष्ट्रातल्या ७८ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यामध्ये रश्मी करंदीकर यांचे नाव पहिले आहे.
पोलीस अधिकारी रश्मी करंदीकर यांचा राष्ट्रपती पदकाने सन्मान केला जाणार आहे. त्यांनी दिलेल्या गुणवत्तापूर्ण सेवेसाठी त्यांना हे पदक दिले जाणार आहे. महाराष्ट्रातून रश्मी करंदीकरांसह संजय जाधव, राजेश्वरी कोरी, रविंद्र चारदे, अरुण परिहार, अमित तिमांडे आणि योगेश जाधव या अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. रश्मी करंदीकर या सध्या अतिरिक्त पोलीस महासंचालक या पदावर कार्यरत आहेत. रश्मी करंदीकर या उत्तम पोलीस अधिकारी म्हणून ओळखल्या जातात.
पोलीस खात्यात भरती होते, तेव्हा ती व्यक्ती असते अक्षरशः मातीच्या गोळ्यासारखी! त्या व्यक्तीच्या संपर्कात येणारा पहिला वरिष्ठ अधिकारी तिला ठाकून ठोकून ‘घडवण्याची’ प्रक्रिया सुरू करतो, तेव्हाच त्या मातीच्या गोळ्याला सुबक आकार प्राप्त होतो. त्यात वरिष्ठ पोलीस अधिकारी अर्चना त्यागी मॅडमसारखे कर्तव्यतत्पर असतील तर? प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून त्यांच्या हाताखाली मी रुजू झाले आणि माझा उमेदवारीचा काळ कसा असेल ते लगेच माझ्या लक्षात आले. – रश्मी करंदीकर, अतिरिक्त पोलीस महासंचालक