Sunday, April 20, 2025
Homeताज्या घडामोडीVIDEO : भाजपाने निवडणुकीसाठी लाँच केलेली जबरदस्त कँपेन थीम बघाच!

VIDEO : भाजपाने निवडणुकीसाठी लाँच केलेली जबरदस्त कँपेन थीम बघाच!

‘सपने नहीं, हकीकत बुनते हैं। तभी तो सब मोदी को चुनते हैं।’

नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीने आगामी (२०२४) लोकसभा निवडणुकीसाठी थीम साँग (campaign theme) लाँच (VIDEO) केले आहे. याला ‘सपने नहीं, हकीकत बुनते हैं। तभी तो सब मोदी को चुनते हैं।’ (Modi ko chunte hain) असे शीर्षक देण्यात आले आहे. या व्हिडिओमध्ये उज्ज्वला, डीबीटी, प्रत्येक घरात पाणी, प्रधानमंत्री आवास योजना तसेच केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणासह विविध गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत.

युवा मतदारांसोबत बोलताना मोदी म्हणाले, ‘स्थिर सरकार मोठे निर्णय घेत असते, आमच्या सरकारने अनेक दशकांपासून प्रलंबित असलेले मुद्दे सोडवले. १०-१२ वर्षांपूर्वी जी स्थिती होती, त्यांनी देशातील युवा वर्गाचे भविष्य अंधकारमय केले.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हर्च्यूअल माध्यमाने युवा वर्गाला संबोधित केले. भूतकाळात भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांच्या हेडलाइन असायच्या. आता चर्चा विश्वसनीयता आणि यशोगाथेच्या होत आहेत. तुमची स्वप्नं, माझा संकल्प आहे, ही मोदीची गॅरंटी आहे. आज देशातील तरुण मतदारांसोबत संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, नव तरुण आपल्या मताच्या माध्यमाने देशाची दिशा आणि दशा ठरवणार आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -