Sunday, March 23, 2025
Homeताज्या घडामोडीRepublic Day 2024: प्रजासत्ताक दिनी फिरण्यासाठी ही आहेत बेस्ट ऐतिहासिक ठिकाणे

Republic Day 2024: प्रजासत्ताक दिनी फिरण्यासाठी ही आहेत बेस्ट ऐतिहासिक ठिकाणे

मुंबई:या वर्षी २६ जानेवारी २०२४ला भारत आपला ७५वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. देशभरात या दिवशी सुट्टी असते. २६ जानेवारीच्या दिवशी दरवर्षी दिल्लीच्या कर्तव्य पथावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. हा दिवस विविधतेत एकता हे दर्शवतो.

सोबतच या दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या शूरवीर सैनिकांच्या आठवणी ताज्या केल्या जातात. यावर्षी २६ जानेवारी शुक्रवारी येत आहे. अशातच शुक्रवार, शनिवार आणि रविवार हा लाँग वीकेंड येत आहे. त्यामुळे तुम्ही या वीकेंडला भारतातील ऐतिहासिक ठिकाणी जाऊ शकता.

दिल्ली – जर तुम्हाला प्रजासत्ताक दिनाचा भव्यदिव्य सोहळा पाहायला असेल तर तुम्ही दिल्लीला जाऊ शकता. दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनाचा सोहळा उत्साहात तसेच जल्लोषात पार पाडला जातो. या दिवशी परेडचेही आयोजन केले जाते. ही परेड राष्ट्रपती भवनाच्या गेटपासून सुरू होत इंडिया गेट पर्यंत पोहोचते.

जालियनवाला बाग – २६ जानेवारीच्या निमित्ताने तुम्ही जालियनवाला बाग येथेही फिरायला जाऊ शकता. जालियनवाला बाग असे ठिकाण आहे जिथे हजारो सामान्य लोकांवर अंधाधुंद गोळीबार करण्यात आला होता. जालियनवाला बाग पंजाबच्या अमृतसर येथे आहे. येथे तुम्ही वाघा-अटारी बॉर्डरही पाहू शकता.

साबरमती आश्रम – अहमदाबाद स्थित साबरमती आश्रम, स्वातंत्र्य आंदोलनादरम्यान महात्मा गांधींच्या जीवनाची झलक सादर करतात. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने येथे अनेक प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केलेले असते.

कारगिल वॉर मेमोरियल – प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने तुम्ही लडाखस्थित कारगिल वॉर मेमोरियलही फिरायला जाऊ शकता. १९९९मध्ये झालेल्या कारगिल युद्धात भारतीय सैन्याने पाकिस्तानला हरवले होते. या युद्धात शहीद झालेल्या भारतीय वीर पुत्रांना श्रद्धांजली देण्यासाठी कारगिल वॉर मेमोरियल बनवण्यात आले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -