Sunday, July 21, 2024
Homeताज्या घडामोडीPM Narendra Modi : राम मंदिर, अटल सेतू, सोलापूर कामगार वसाहत यानंतर...

PM Narendra Modi : राम मंदिर, अटल सेतू, सोलापूर कामगार वसाहत यानंतर आणखी एक मोठा प्रकल्प!

‘या’ प्रकल्पामुळे मालवाहतुकीचा खर्च आणि वेळ कमी होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) देशाच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या अनेक प्रकल्पांचे उद्घाटन केले. मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी नियंत्रणात आणणारा अटल सेतू (Atal Setu), ३० हजार कामगारांच्या घराचं स्वप्न पूर्ण करणारी सोलापूरमधील कामगार वसाहत (Solapur labour colony) असे अनेक प्रकल्प सुरु करण्यात आले. हिंदूंसाठी अत्यंत पवित्र अशा भव्य राम मंदिराचे (Ayodhya Ram Mandir) उद्घाटनही करण्यात आले. यानंतर आता भारत सरकार आणखी एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या उद्घाटनाच्या तयारीत आहे.

देशातील ईस्टर्न (Eastern) आणि वेस्टर्न (Wetsern) डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरला (Dedicated Freight Corridors) जोडणाऱ्या इलेक्ट्रिक दुहेरी रेल्वे मार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या उद्घाटन करणार आहेत. ही रेल्वे लिंक न्यू खुर्जा जंक्शन ते रेवाडी रेल्वे स्थानकाला जोडणार आहे. त्यामुळे प्रवासी रेल्वे गाड्यांना होणारा विलंब दूर होईल आणि देशातील लॉजिस्टिक खर्चात लक्षणीय घट होईल. एवढेच नाही तर खुर्जा ते रेवाडी दरम्यान लागणारा वेळ २० तासांनी कमी होईल. डीएफसीच्या निर्मितीनंतर देशातील मालगाड्यांना गाझियाबाद आणि दिल्लीच्या गजबजलेल्या एनसीआर भागातून जावे लागणार नाही.

काय आहेत या रेल्वे लिंकची वैशिष्ट्ये?

देशातील दोन डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरला (DFC) जोडणारी ही रेल्वे लिंक १७३ किलोमीटर लांब आहे. यासाठी १० हजार १४१ कोटी रुपये खर्च आला आहे. ती नोएडातील न्यू बोराकी येथून सुरू होईल आणि या मार्गावर न्यू दादरी, न्यू फरिदाबाद, न्यू पृथला, न्यू तवाडू आणि न्यू धारुहेरा अशी सहा स्थानके असतील.

या भागावर एक किलोमीटर लांबीचा दुहेरी रेल्वे बोगदाही बांधण्यात आला आहे. जगातील हा अशा प्रकारचा पहिला बोगदा आहे. या बोगद्यातून डबल डेकर कंटेनरही सहज जाऊ शकतात. हा रेल्वे दुवा दादरी येथे ४.५४ किमी लांबीच्या रेल्वे उड्डाणपुलाद्वारे (RFO) DFC ला भारतीय रेल्वेशी जोडतो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -