क्षीरसागर यांची धक्कादायक माहिती नितेश राणे यांच्या हाती?
सोलापूर : अयोध्येतील प्रभू श्री रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मीरा भाईंदर मध्ये झालेल्या प्रकारापाठोपाठ सोलापूर मध्ये देखील असाच काहीसा प्रकार झाल्याने हिंदू बांधवांमध्ये प्रचंड संतांची लाट उसळली आहे. एवढेच नव्हे तर येथील पोलीस अधिकारी न्यायाची बाजू न घेता आरोपींना सहकार्य करत असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत असल्याने यात त्यांचे काही आर्थिक हितसंबंध तर नाही ना ? असा संशय हिंदू बांधवांना या निमित्ताने येत आहे. सदर प्रकरणाची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी चौकशी करून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर व हिंदू बांधवांना मारहाण करणाऱ्या गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
येथे २२ तारखेला सायंकाळी राम उत्सोव शोभा यात्रा निघाली होती. सदर यात्रेत काही जिहादी मुस्लिम मुलांनी हिंदू मुलांना कोयता, लाकडे, लोखंडी रॉड ने मुलांना जबर मारहाण केली. त्यात पाच मुलांचे डोकी फुटलीत. तर काहींना गंभीर मार लागला आहे. सध्या तीन मुले उपचार घेत असून बाकी मुलांना जखमी अवस्थेत पोलीस स्टेशन मध्ये नेवून त्यांची चौकशी करून बळजबरी घरी पाठवण्यात आले आहे. तसेच सदर विषयात पोलीस निरीक्षक क्षीरसागर यांचे काही आर्थिक व्यवहार तर झाले नाही ना? कारण सदर गुन्ह्यात कलम ३०७ ने कारवाई बसत असताना कलम ३२६ ने कारवाई करण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर पीआय क्षीरसागर, रफिक हत्योरे, मुल्ला कॉन्स्टेबल यांनी घटनेतील फिर्यादी गणेश नराले याला बेदम मारले असून त्याचे फोटो बघून संतापाची लाट उसळली आहे. सात फिर्यादी असताना एकाचा जवाब घेण्यात आला आहे.
तर अजब म्हणजे एकूण २२ हिंदू मुलांवर कलम १८८ नुसार गुन्हे दाखल केले आहेत. आणि पीआय क्षीरसागर यांची आर्थिक चौकशीची मागणी आमदार नितेश राणे करणार असल्याची खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिली असून क्षीरसागर यांनी आत्तापर्यंत मोठ्या प्रमाणात संपत्ती तर जमवली नाही ना? आणि सदर संपत्ती कुठे कुठे घेतली आणि त्यांचे आर्थिक लागेबांधे कुठे कुठे आहेत या सर्वच गोष्टी अधिवेशनात निघतील हे बघ्याचे ठरेल.