Friday, May 9, 2025

देशताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

ममता बॅनर्जी यांच्या कारला अपघात

ममता बॅनर्जी यांच्या कारला अपघात

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये स्वळावर लोकसभा निवडणुक लढविण्याची घोषणा केल्यावर आपल्या नियोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व्यस्त झाल्या. दुपारी साडेतीनच्या सुमारास ममता बॅनर्जी या कोलकाता येथे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासह जात होत्या. यावेळी त्यांच्या कारला अपघात झाला आहे. यामध्ये ममता यांच्या डोक्याला जखम झाली आहे.


बर्धमानहून ममता या कोलकाता येथे परतत होत्या. यावेळी पाऊस सुरु होता. या पावसामुळे धुक्याचे वातावरण पसरले होते. ममता यांच्या ताफ्यातील पुढील कारच्या चालकाला काही दिसत नसल्याने ब्रेक लावले. यामुळे ममता यांच्या कार चालकालाही अचानक ब्रेक मारावे लागले. यामुळे ममता यांचे डोके पुढील डॅशबोर्डवर आदळले. यामुळे ममता यांना दुखापत झाली आहे. बर्धमानला त्या एका कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी गेल्या होत्या. त्या तिथून हेलिकॉप्टरने परतणार होत्या. परंतु खराब वातावरणामुळे हेलिकॉप्टरने जाता आले नाही. यामुळे त्यांनी रस्ते मार्गे परतण्याचा निर्णय घेतला होता.

Comments
Add Comment