Friday, July 19, 2024
Homeताज्या घडामोडीChavdar tale : महाडच्या चवदार तळ्याचे रूप पालटणार!

Chavdar tale : महाडच्या चवदार तळ्याचे रूप पालटणार!

विद्युत रोषणाईने चवदार तळ्यासह जिजामाता उद्यान, रायगड रोड उजळणार

चवदार तळे सुशोभिकरणाचा ६५ कोटीचा प्रस्ताव सादर

महाड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समतेचा संदेश संपूर्ण जगाला देत सर्व मानवजातीला चवदार तळ्यातील (Chavdar tale) पाणी खुले व्हावे यासाठी सत्याग्रह केला ते ऐतिहासिक चवदार तळे पाहण्यासाठी देशभरातून लाखो आंबेडकर अनुयायी आणि पर्यटक महाड येथे येतात. या ऐतिहासिक चवदार तळ्याच्या सौदर्यीकरणासाठी ६५ कोटीचा प्रस्ताव समाज कल्याण विभागाकडे पाठवण्यात आला. या दरम्यान शहरामध्ये विदयुत पोल वसविणे, चवदार तळे सुशोभिकरण अंतर्गत डेकोरेटिव्ह पोल बसविणे, जिजामाता उद्यान येथे सुशोभिकरण अंतर्गत डेकोरेटिव्ह पोल बसविणे यासाठी वैशिष्ठपुर्ण अनुदाना अंतर्गत महाड नगरपरिषदेला ७.५ कोटीचा निधी प्राप्त झाला असून हे सुशोभिकरणाचे काम प्रगती पथावर आहे.

महाड नगरपरिषदेस प्राप्त वैशि्टयपूर्ण अनुदान अंतर्गत शहरामध्ये विद्युत पोल बसविणे, चवदार तळे सुशोभीकरण अंतर्गत डेकोरेटिव पोल बसविणे, जिजामाता उद्यान येथे सुशोभीकरण अंतर्गत डेकोरेटिव पोल बसविण्याचे काम करण्यात येत आहे. या अंतर्गत शहरामध्ये एकूण ७.५ कोटी निधी प्राप्त झाला. याखेरीज जिल्हा नियोजन समितीकडून चवदार तळे येथे डॉ फसाड लाईटस व सुशोभिकरणासाठी १ कोटीचा निधी मंजुर झाला असून हे सुशोभिकरणाचे कामही सुरु होणार आहे. त्यामुळे लवकरच चवदार तळ्याचे रूप पालटणार असून आंबेडकर अनुयायी आणि पर्यटकांना नव्या रुपातील चवदार तळे पहायला मिळणार आहे.

गेली अनेक वर्षापासून आंबेडकरी समाजासह बहुजन समाजाकडून चवदार तळ्याच्या सौदर्यीकरणाची मागणी होत आहे. डिसेंबर जानेवारीमध्ये राज्यभरातून मोठ्या प्रमाणात सहली महाडमध्ये येत असतात. सायंकाळ नंतर येणाऱ्या सहलीतील मुलांना चवदार तळे नीट पाहताही येत नाही. ही बाब विचारात घेऊन गतवर्षी महाड प्रेस असोसिएशनच्यावतीने चवदार तळ्याच्या सभोवती विद्युत रोषणाई करण्याची मागणी केली होती. या सर्वांची दखल घेऊन महाड नगर परिषद प्रशासनाकडून चवदार तळे सुशोभीकरणाकरिता एकूण ६५ कोटीचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला असून सदरचा प्रस्ताव मंजुरीसाठी समाज कल्याण विभाग येथे पाठविण्यात आला आहे. चवदार सुशोभीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीकडून १ कोटी निधी मंजूर झाला. लवकरच सदरचे काम सुरू करण्यात येणार आहे. या अंतर्गत डॉ फसाड लाईटस् व सुशोभीकरण करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेचे विद्युत विभाग अभियंता साळवी यांनी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -