
पहिल्या कसोटीसाठी इंग्लंडने आपल्या प्लेईंग ११मध्ये वरिष्ठ वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनला सामील करण्यात आलेले नाही आहे. तर पिच पाहता बेन स्टोक्सने अंतिम ११मध्ये दोन स्पिनर्सना सामील केले आहे. याशिवाय हॅरी ब्रूकच्या जागी बेन फोक्सला संधी मिळाली आहे.
इंग्लंडच्या प्लेईंग ११ बद्दल बोलायचे झाल्यास जॅक क्रॉली आणि बेन डकेट डावाची सुरूवात करतील. यानंतर ओली पोप आणि अनुभवी फलंदाज ज्यो रूट खेळताना दिसेल. पाचव्या स्थानावर जॉनी बेअरस्ट्रॉ खेळेल. दरम्यान त्याच्यावर विकेटकीपिंगची जबाबदारी नसेल. अशातच तो फलंदाज म्हणून खेळताना दिसेल. नंतर कर्णधार बेन स्टोक्स खेळेल. स्टोक्स संपूर्ण मालिकेत सहाव्या स्थानावर खेळताना दिसेल. यानंतर विकेटकीपर बेन फोक्स खेळले. अशा पद्धतीने इंग्लंडचा संघ पहिल्या कसोटीत सात फलंदाजांसह उतरणार आहे.
पहिल्या कसोटीसाठी इंग्लंडचे प्लेईंग ११ - जॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, ज्यो रूट, जॉनी बेअरस्ट्रॉ, बेन स्टोक्स(कर्णधार), बेन फोक्स(विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, जॅक लीच आणि मार्क वूड.