
मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी दिली माहिती
मुंबई : भारत जोडो न्याय यात्रेमुळे (Bharat Jodo Nyay Yatra) आसाममध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या चांगलेच अडचणीत सापडले आहेत. परवानगी नसतानाही मुख्य रस्त्यावरुन काढलेल्या यात्रेमुळे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांनी काँग्रेस नेत्यांविरोधात एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला असल्याची माहिती दिली आहे. राहुल गांधींसोबतच के.सी. वेणुगोपाल, कन्हैय्याकुमार आदी नेत्यांविरोधात एफआयआर दाखल झाला आहे.
हिमंता बिस्वा सरमा यांनी ट्वीट करून सांगितले आहे की, काँग्रेसच्या सदस्यांनी हिंसाचार, चिथावणी देणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला. त्याशिवाय पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी राहुल गांधी, केसी वेणुगोपाल, कन्हैया कुमार आणि इतर लोकांविरुद्ध कलम १२० (बी) १४३/१४७/१८८/२८३/४२७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री बिस्वा यांनी दिली. त्याशिवाय पीडीपीपी कायद्यातील कलम ३५३ (लोकसेवकावर हल्ला), कलम ३३२ (लोकसेवकाला कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी स्वेच्छेने गंभीर दुखापत करणे), आणि कलम ३३३ (लोकसेवकाला कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी स्वेच्छेने गंभीर दुखापत करणे) आदींसारखे अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
With reference to wanton acts of violence, provocation , damage to public property and assault on police personnel today by Cong members , a FIR has been registered against Rahul Gandhi, KC Venugopal , Kanhaiya Kumar and other individuals under section…
— Himanta Biswa Sarma (@himantabiswa) January 23, 2024
याआधी मंगळवारी २३ जानेवारी रोजी राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला गुवाहाटीत प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले होते. यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन करत बॅरिकेड्स तोडले. यावर मुख्यमंत्री सरमा यांनी म्हटले की, हिंसा ही आसामच्या संस्कृतीचा भाग नाही. आम्ही शांतताप्रिय राज्य आहोत. असे नक्षलवादी डावपेच आपल्या संस्कृतीच्या पूर्णपणे विरुद्ध आहेत. तुमच्या बेजबाबदार वृत्तीमुळे आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केल्यामुळे गुवाहाटीच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाल्याचे त्यांनी म्हटले. या सर्व प्रकरणामुळे लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या असताना काँग्रेस पक्षाच्या अडचणी वाढणार आहेत.