Tuesday, July 16, 2024
Homeताज्या घडामोडीEarthquake: सलग तिसऱ्या दिवशी भारतात बसले भूकंपाचे धक्के

Earthquake: सलग तिसऱ्या दिवशी भारतात बसले भूकंपाचे धक्के

नवी दिल्ली: भारतात आज सलग तिसऱ्या दिवशी भूकंपाचे धक्के बसले. देशात तीन विविध राज्यांत आलेल्या भूकंपामुळे धरती हलली. सगळ्यात आधी कर्नाटक, नंतर छत्तीसगड आणि अखेरीस उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये भूकंपाचे धक्के बसले. दरम्यान, या भूकंपादरम्यान कोणत्याही प्रकारची हानी झाल्याचे वृत्त नाही आहे. शेजारील देश पाकिस्तान आणि म्यानमारमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.

नॅशनल सेंटर फॉर सीस्मॉलॉजीनुसार आज दुपारी २.१३ वाजता कर्नाटकच्या बेल्लारीमध्ये हलके भूकंपाचे धक्के जाणवले याची तीव्रता २.८ रिश्टर स्केल इतकी होती. तर छत्तीसगडच्या जांजगीर चांपामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. ३.४० वाजता आलेल्या भूकंपाची तीव्रता २.९ रिश्टर स्केल इतकी होती. १६ मिनिटांनी ३.५६ मिनिटांनी उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये भूकंप आला. याची तीव्रता २.४ रिश्टर स्केल इतकी होती.

पाकिस्तान-म्यानमारमध्ये किती तीव्रतेचा भूकंप?

पाकिस्तानातही भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचे होते. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार अद्याप कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही. नॅशनल सेंटर फॉर सीस्मॉलॉजीनुसार पाकिस्तानात संध्याकाळी ४.१६ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. म्यानमारमध्ये सकाळी ८.५२ मिनिटांनी ३.२ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले.

तिसऱ्या दिवशी तिसरा भूकंप

भारतात याआधी सोमवारी रात्री उशिरा साधारण १२.४५ वाजता भूकंप आला होता. या भूकंपाचे केंद्रबिंदू चीनमध्ये होते. दिल्ली-एनसीआरसहित उत्तर भारतात भूकंपाचे वेगवान झटके बसले. दरम्यान, यात कोणतीही जिवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -