फेब्रुवारीमध्ये रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येला जाऊ नका

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला केंद्रीय मंत्र्यांना सल्ला


नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिरात २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात पार पडला. यानंतर काल म्हणजेच मंगळवारी पहिल्याच दिवशी नवं रेकॉर्ड बनले आहे. पहिल्याच दिवशीच मंदिरात ५ लाख भविकांनी दर्शन घेतले. मंदिराकडे जाणारा रामपथ भाविकांच्या गर्दीने पहाटेपासूनच ओसंडून वाहत होता. अयोध्येत वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व केंद्रीय मंत्र्यांना अयोध्येत न जाण्याचा सल्ला दिला आहे.


केंद्रीय मंत्रिमंडळाची बुधवारी (२४ जानेवारी) बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील राम मंदिरात न जाण्याचा सल्ला दिला आहे. अयोध्येत राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्या झाल्यापासून दर्शनासाठी भाविकांची गर्दी होताना दिसून येत आहे. त्यामुळे व्हीआयपी नेते तिथे गेल्यास व्हीआयपी प्रोटोकॉलमुळे गर्दीत भर पडेल, परिणामी भाविकांना अडचण निर्माण होऊ नये, यासाठी गर्दीमुळे फेब्रुवारीमध्ये रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येला जाणे टाळावे, असे सर्व केंद्रीय मंत्र्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. दरम्यान, सुत्रांच्या माहितीनुसार, मार्च महिन्यात केंद्रीय मंत्री राम मंदिराच्या दर्शनासाठी जाणार आहेत.


नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येतील श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. याबाबत बुधवारी मंत्रिमंडळाने आभार प्रस्ताव मंजूर केला. राजनाथ सिंह यांनी हा प्रस्ताव मंत्रिमंडळात ठेवला होता. मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधानांनी मंत्र्यांना राम मंदिराच्या उद्घाटनाबाबत जनतेला काय संदेश आहे, अशी विचारणा केली. सर्व मंत्र्यांनी पंतप्रधानांना जनतेच्या संदर्भात प्रतिक्रिया दिल्या. यादरम्यान मंत्रिमंडळाने कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याच्या निर्णयाबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानले.

Comments
Add Comment

आता बोला? एकाच घरात ४,२७१ मतदार!

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात त्रिस्तरीय पंचायत निवडणुकीच्या मतदार यादीत मोठी अनियमितता समोर

राहुल गांधींचा 'मतदारचोरी'चा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला; 'ऑनलाइन' मतदान वगळणे शक्य नाही

नवी दिल्ली: कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या