मुंबई: घराला चमकदार बनवण्यासाठी अनेक लोक विविध उपाय वापरत असतात. दरम्यान, घरातील नफ साफ करायला मात्र बरेच जण विसरता. खासकरून बाथरून आणि किचनमध्ये लावलेले नळ लवकर खराब होतात. जे साफ करणे सोपे नसते. अशातच अॅल्युमिनियम फॉईलचा वापर यासाठी बेस्ट ठरू शकतो. याच्या मदतीने तुम्ही घरात लावलेले नळ चुटकीत तुम्ही स्वच्छ करू शकता.
अॅल्युमिनियम फॉईलचा वापर साधारणपणे टिफिनमध्ये जेवण गरम करण्यासाठी केला जातो. मात्र फार कमी लोकांना माहीत आहे की या फॉईलच्या मदतीने तुम्ही नळाचीही सफाई करू शकता. अॅल्युमिनियम फॉईलच्या मदतीने तुम्ही अगदी नव्या सारखे नळ चमकवू शकता.
बाथरूम आणि किचनमधील लावलेले नळ खराब झाल्यास साफ करण्यासाठी तुम्ही जुनी अथवा नवी अॅल्युमिनियम फॉईल वापरू शकता. यासाठी अॅल्युमिनियम फॉईल फोल्ड करून घ्या. ही फॉईल नळावर नीट रगडून घ्या. ५-७ मिनिटे रगडल्यानंतर नळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. नळ चमकू लागेल.
अनेकदा नळावर पाण्याचे डाग आणि घाणेरड्या हातांचे निशाण लागतात. यामुळे नळावर डाग आणि काळे धब्बे दिसू लागतात. अशातच नळाला क्लीन करण्यासाठी बेकिंग सोडा आणि मीठाचा वापर करणे बेस्ट ठरते.