Monday, July 1, 2024
HomeदेशAyodhya Ram Mandir : दुस-या दिवशीही अयोध्येत उसळला जनसागर; रामलल्लाच्या दर्शनासाठी रामभक्तांची...

Ayodhya Ram Mandir : दुस-या दिवशीही अयोध्येत उसळला जनसागर; रामलल्लाच्या दर्शनासाठी रामभक्तांची अलोट गर्दी!

दोन दिवसांत तब्बल पाच लाखांहून अधिक भाविकांनी घेतलं दर्शन

प्रचंड गर्दीमुळे वाहनांच्या मार्गांमध्ये देखील करावा लागला बदल

अयोध्या : अयोध्येतील भव्य अशा राम मंदिरात (Ayodhya Ram Mandir) २२ जानेवारीला रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा (RamLalla Pran Pratistha) करण्यात आली आणि हिंदूंची (Hindu) पाचशे वर्षांची प्रतिक्षा संपली. हा अभूतपूर्व क्षण संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अयोध्यानगरी देखील दिव्यांच्या लखलखाटाने उजळून निघाली होती. रामलल्लाच्या या दर्शानासाठी सारेच रामभक्त आतुरले होते. काल मंगळवारपासून हे दर्शन सर्वसामान्यांसाठी खुलं करण्यात आलं. आश्चर्याची बाब म्हणजे पहिल्या दोन दिवसांतच पाच लाखांहून अधिक भाविकांनी रामलल्लाचं दर्शन घेतलं आहे. राम मंदिर परिसरात जनसागर उसळला आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी प्राण प्रतिष्ठापनेच्या वेळी सुरक्षा व्यवस्थेचा लाईव्ह स्ट्रिमिंगद्वारे आढावा घेतला. मंदिर परिसरात चेंगराचेंगरी होऊ नये आणि शिस्तीने सगळ्यांना दर्शन घेता यावं यासाठी ८ हजारांहून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. अयोध्येत रामभक्तांची जी गर्दी झाली आहे ती नियंत्रणात आणण्यासाठी अयोध्येत येणाऱ्या वाहनांवर निर्बंध लावण्यात आले आहेत.

भाविकांची प्रचंड गर्दी पाहता बाराबंकी पोलिसांनी रामभक्तांना पुढे न जाण्याचे आवाहन केले आहे. अयोध्या ते बाराबंकी हे अंतर सुमारे १०० किलोमीटर आहे. पोलिसांनी लोकांना यापुढे न जाण्याचे आवाहन केले आहे. अयोध्या धाममध्ये भाविकांची संख्या मोठी असल्याने सर्व वाहनांच्या मार्गांमध्ये बदल करण्यात आला आहे. दरम्यान, अयोध्येत भाविकांच्या अनेक किलोमीटर लांब गर्दीमुळे राम लल्लाचे दर्शन थांबवले नसल्याचे स्पष्टीकरण अयोध्या पोलिसांनी दिले आहे.

रामलल्लाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झाल्यानंतर प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी अयोध्येत भाविकांची गर्दी होऊ लागली आहे. अयोध्येला पोहोचणाऱ्या हजारो भाविकांना कोणत्याही मार्गाने लवकरात लवकर मंदिरात पोहोचून रामल्लाचे दर्शन घ्यायचे आहे. पहाटे दोन वाजल्यापासून राम मंदिराच्या मुख्य दरवाजाबाहेर भाविकांची मोठी रांग लागली होती. गर्दीत उपस्थित लोक गेटसमोर ‘जय श्री राम’चा जयघोष करत मंदिरात प्रवेश करताना दिसत होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -